पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : कोण होणार कॅप्टन? विणा की रुपाली

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानी सुर्वेची एन्ट्री झाली आहे. शिवानीच्या घरामध्ये येण्याने नेहा आणि माधवला आता थोडा धीर मिळाला आहे. तर हिनाला काल रडू कोसळले ज्याप्रकारे माधव आणि सगळे तिच्याशी वागतात तिला घरामध्ये एकटे पडल्यासारखे वाटत आहे.  याबद्दल नंतर माधवने तिची माफी मागितली आणि तिच्यासोबत डान्स देखील केला. 

War Teaser : हृतिक- टायगरचा 'वॉर' मोड ऑन

तर WEEKEND चा डावमध्ये रुपाली आणि वीणाची महेश मांजरेकर यांनी चांगलीच शाळा घेतली. मागील आठवड्यामध्ये ज्याप्रकारे रुपाली आणि वीणा किशोरी शहाणे यांच्याशी वागल्या ते अत्यंत चुकीचे होते आणि शिव आणि वीणा घरामध्ये अजिबात खेळत नसून एकमेकांमागे त्यांचा वेळ जातो आहे हे प्रेक्षकांना देखील दिसते आहे आणि त्यांचे हे वागणे निराशाजनक असल्यांचं दाखवून देण्यात आलं.

त्या फोटोमुळे प्रियांका Global Social Media Climbers Chart मध्ये अव्वल

गेल्या आठवड्यात घरातून कोणीही बाहेर पडलं नाही. आजच्या भागात घरामध्ये रुपाली आणि वीणामध्ये कॅप्टनसी टास्क रंगणार आहे. घराचा कॅप्टन बनणे ही खूप मोठी जबाबदारी आहे आणि त्याचबरोबर कॅप्टन बनलेल्या सदस्याला आठवड्याची इम्युनिटी देखील मिळते त्यामुळे हा टास्क जिंकून कॅप्टन बनणे हे प्रत्येक सदस्यासाठी खूप महत्वाचे असते. आता या टास्कमध्ये रुपाली आणि वीणा मध्ये कोण जिंकणार हे बघणे रंजक असणार आहे. कॅप्टनसी कार्यामध्ये आपल्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी एका सदस्याला साष्टांग नमस्कार घालण्यासाठी तयार करायचे आहे.