पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवानीसोबत मैत्री ठेवायला वीणाचा नकार

शिवानी सुर्वे

बिग बॉसचा खेळ आता निर्णायक वळणावर पोहोचला आहे. घरात केवळ पाच सदस्य उरले आहेत. हे पाच सदस्य टॉप ५ मध्ये पोहोचले आहेत, त्यातून बिग बॉसचं विजेतपद कोण मिळवणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 

दरम्यान आजचा भाग हा विशेष असणार  आहे.  घरामधील सदस्य एकमेकांवर अनेक आरोप प्रत्यारोप करतात, एकमेकांना जाब विचारतात पण आजच्या भागात पत्रकार घरातील सदस्यांना जाब विचारणार आहेत. 

रातोरात स्टार झालेल्या रानू मंडल यांना हिमेशनं दिलं इतकं मानधन

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वीणा आणि शिवानीचे काय नाते आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. या दोघींचे एकमेकींशी अजिबात पटत नाही. यासाठी दोघींना पूर्वी बिग बॉसनं शिक्षाही दिली होती. शिवानी  घरातून बाहेर पडल्यानंतर वीणानं तिच्या खासगी आयुष्यावरही टीप्पणी केली होती जी शिवानीच्या कुटुंबीयांनाही  खटकली होती.

सलमाननं सोडला 'इंशाअल्लाह'?

बिग बॉसच्या घरात आल्यानंतर शिवानीनं वीणाला तिच्या कुटुंबीयांची माफी मागायलाही भाग पाडलं होतं. घरात आलेल्या पत्रकारांनी वीणाला एक प्रश्न विचारला होता. या घरामधून बाहेर गेल्यावर कोणाशी मैत्री कायम ठेवायला आवडेल आणि कोणाचं तोंडसुध्दा बघायची इच्छा नाहीये ? असा प्रश्न वीणाला विचारण्यात आला होता. 

काश्मीरवर राज्य करणाऱ्या शेवटच्या हिंदू राणीवर चित्रपट

ज्यांना माझं तोंड बघायचं नाही त्यांचं तोंड बघायची मलाही इच्छा नाही, असं  बेधडकपणे विणा म्हणाली. 'बरी दिसते वीणा. बघू शकते मी तीच तोंड' असं शिवानी म्हणाली. मात्र शिवानीचं मध्ये बोलणं वीणाला रुचलं नाही. मी तिच्यासोबत मैत्री नाही करूच शकत असं वीणा रागानं म्हणाली. घरातून बाहेर पडल्यानंतर शिवानीसोबत कधीही मैत्रीचं नातं राहू शकत नाही हे एकप्रकारे वीणानं सर्वांसमोर स्पष्ट केलं.