पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अभिजित बिचुकले बिग बॉसमध्ये परतले तर? वैशालीनं दिलं उत्तर

वैशाली म्हाडे

तब्बल आठ आठवडे बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर  गायिका वैशाली म्हाडे अखेर घराबाहेर पडली.  बिग बॉसच्या विजेतेपदाची ती एक प्रबळ दावेदारही मानली जात होती. मात्र घरातील तिचा प्रवास संपला आहे. घरातून बाहेर पडलेल्या वैशालीचे अनुभव ऐकण्यास तिचे चाहते कमालीचे उत्सुक होते. 

घरातून बाहेर पडल्यानंतर वैशालीनं कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून चाहत्यांशी फेसबुक लाईव्हद्वारा संवाद साधला. यावेळी  तिला अभिजित बिचुकलेंविषयीही विचारण्यात आले. अभिजित बिचुकले बिग बॉसमध्ये परतले तर? असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. अभिजित बिजुकलेंना घरात पुन्हा पाहायला आवडेन असं उत्तर वैशालीनं दिलं आहे. 

रुपाली फक्त माणसांचा वापर करते, वैशालीचं रोखठोक मत

खंडणी आणि चेक बाऊन्स प्रकरणात सध्या बिचुकले अटकेत आहेत. सातारा पोलिसांनी त्यांना बिग बॉसच्या घरातून अटक केली होती. गेल्या महिन्यात त्यांना अटक करण्यात आली. बिग बॉसच्या घरातील वादग्रस्त स्पर्धक म्हणून ते ओळखले जातात. ते अटकेत असले तरी त्यांच्या नावाची पाटी आणि  त्यांची बॅग सुद्धा घरात आहे, असं पराग कान्हेरे टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला होता. 'दी लायन किंग'

ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा हॉलिवूड चित्रपट

त्यामुळे अभिजित बिचुकले घरात परतणार का? याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे. वैशाली आणि अभिजित बिचुकले यांचे सुरुवातीला चांगलं जमायचं. घरातील इतर सदस्य बिचुकलेंविरोधात  असताना वैशालीनं मात्र अनेकदा अभिजित बिचुकले यांना सांभाळून  घेतलं आहे. त्यामुळे ते शोमध्ये आले तर मला आवडेन असं वैशाली म्हणाली.