पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : कुठली टीम मारणार साप्ताहिक कार्यात बाजी ?

बिग बॉस

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. हे कार्य जिंकण्यासाठी सदस्य  पुर्णपणे साम दाम दंड भेद या नितीचा वापर करताना  दिसत आहेत. दोन्ही टिमचा आपलं चातुर्य वापरून टास्क जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. 

काल या टास्क मध्ये विणाची टीम विजेती ठरली.  विणाच्या टीमने चातुर्याने  टास्कमध्ये विजय मिळवला. आज देखील विणा आणि पराग मॅनेजर असून आज हे दोघे कुठल्या योजना आखून टास्क जिंकतील हे बघणे रंजक असणार आहे. काल नेहा, पराग VS शिव अशी खडाजंगी बघयला मिळाली, ज्यामध्ये नंतर परागची तब्येत देखील थोडी बिघडली. तर दुसरीकडे शिवने विरोधी टीमची ईस्त्रीदेखील चोरली.

चेक बाऊन्स प्रकरणात अभिजित बिचुकले पोलिसांच्या ताब्यात

आज देखील टास्क जिंकण्यासाठी दोन्ही टीम मध्ये चुरस बघायला मिळणार आहे. आज दोन्ही टीम बळाचा वापर करताना दिसणार आहेत त्यामुळे संचालिकेने म्हणजेच वैशालीने “मी दोन्ही टीमला Disqualify करत आहे असे जाहीर केले”, वैशालीनं दोन्ही टीमला बाद ठरवल्यानंतर हे कार्य आता कोणती टीम जिंकणार  हे पाहण्यासारखं ठरेन. 

दरम्यान बिग बॉसच्या घरातील सदस्य अभिजित बिचुकले यांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. चेक बाऊन्स प्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. बिग बॉसच्या शो मधूनच त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.