पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी सिझन २ : हे सदस्य घराबाहेर जाण्यासाठी झाले नॉमिनेट

बिग बॉस २

'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये काल 'हाफ तिकीट' हे नॉमिनेशन कार्य रंगले. बिग बॉस मराठीच्या घरातील प्रवासाच्या उत्तरार्धाची सुरुवात आता झाली आहे. यापुढे घरातील सदस्यांचा प्रवास अजूनच खडतर होत जाणार आहे, त्यामुळे सदस्यांनी त्यांची घरात रहाण्याची पात्रता सिद्ध करणे तितकेच जिकरीचे बनले आहे.

या घराचा कॅप्टन असल्याने अभिजीत केळकर आठवड्यातील  नॉमिनेशन कार्यापासून सेफ आहे. तर नेहा आणि वीणा या टास्कमध्ये जाणारी पहिली जोडी ठरली. दोघींनी एकमेकींना तिकीट देण्यास साफ नकार दिला. तर दुसरी जोडी हिना आणि शिवची होती. हिनाने शिव आणि तिच्यामध्ये झालेले सगळे वाद विसरून त्याला तिच्याकडचे तिकीट देऊन सेफ केले. तर किशोरी आणि वैशालीमध्ये वाद रंगला. तुमचा मुद्दाच मला पटत नाही असे वैशालीने किशोरीताईंना सांगितले आणि दोघीसुध्दा नॉमिनेशन मध्ये गेल्या. त्यानंतर माधव आणि रुपाली मध्ये देखील कोणीच कुणाला तिकीट न दिल्याने दोघीही नॉमिनेशन मध्ये गेले.

त्यामुळे घराबाहेर जाण्यासाठी वीणा जगताप, रुपाली भोसले, किशोरी शहाणे, माधव देवचके, हिना पांचाळ, नेहा शितोळे आणि वैशाली म्हाडे हे नॉमिनेट झाले आहेत. तर अभिजित केळकर आणि शिव ठाकरे मात्र सेफ झाले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची मते कोणाला वाचवणार ? कोण घराबाहेर जाणार ? हे बघणे रंजक असणार आहे.

आतापर्यंत बिग बॉसच्या घरातून  मैथिली जावकर, दिगंबर नाईक, विद्याधर जोशी,  सुरेखा पुणेकर, शिवानी सुर्वे, अभिजित बिचुकले आणि पराग कान्हेरे हे बाहेर गेले आहेत.