पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : किशोरीताई झाल्या बिचुकलेंच्या आई

किशोरी शाहाणे

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नवे पाहुणे आले आहेत. घरात पुष्कर श्रोत्री, संजय नार्वेकर, मृण्मयी गोडबोले, अनिकेत विश्वासराव यांनी  प्रवेश केला आहे. हे नवे पाहुणे सदस्यांना आज एक मजेदार टास्क देणार आहेत. या टास्कमुळे घरातील वातावरण जरा हलकं व्हायला मदत मिळणार आहे. 

विमानतळावरून सामान वाहून नेणाऱ्या साराच्या साधेपणाचं कौतुक

अभिनेता संजय नार्वेकर यांनी किशोरीताईंना एक मजेशीर टास्क दिला आहे. या टास्कमध्ये किशोरीताई आणि अभिजित बिचुकलेंना आई मुलीच्या भूमिकेत वावराचयं आहे. मुलीच्या भूमिकेत वावरायचं आहे हे ऐकून बिचुकलेंना धक्काच बसला आहे. मात्र हा टास्क इथवरच संपला नाही, बिचुकलेंच्या दोन वेण्या घालून त्यांना शाळेत पाठवण्याचा आदेश नार्वेकर यांनी दिला आहे. 

Video : ऑस्ट्रेलियात शाहरुखभोवती चाहत्यांचा गराडा

त्यामुळे आजच्या भागात बिचुकलेंच्या दोन वेण्या बांधून त्यांना किशोरीताई शाळेत पाठवणार आहेत. या व्यतिरिक्त घरात आलेली ये रे ये रे पैसा २ ची टीम घरातील सदस्यांना काही भन्नाट टास्कही देणार आहे. आजच्या भागात ही सर्व धम्माल मज्जा मस्ती पाहायला मिळणार आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Big boss marathi 2 written update team re ye re paisa 2 give task to kishori shahane and abhijit bichukale