पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : शिवानीनं तयार केला नवा ग्रुप?

शिवानी

शिवानी सुर्वे हे नाव बिग बॉस मराठीच्या घरात आणि घराबाहेर बरेच चर्चेत राहिले. आता पुन्हा हेच नाव चर्चेचा विषय बनलं आहे,  कारण शिवानी गेल्याच आठवड्यात घरामध्ये परत आली आहे. तिचं घरामध्ये अचानक येणं सगळ्याच सदस्यांसाठी आणि प्रेक्षकांसाठी आश्चर्याचा धक्का होता.  घरामध्ये आल्या आल्या शिवानीने तिचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे.

शिवानीनं  वीणाला चांगलीच समज दिली आहे तर दुसरीकडे माधवला सल्ला दिला आहे इतरांना नकोशा झालेल्या नेहाच्या मागेही ती खंबीरपणे उभी आहे. आता शिवानीनं तिचा वेगळा ग्रुप करायचं ठरवलं आहे. कालच्या भागामध्ये तिने रुपाली आणि किशोरी ताईंना आपण एकत्र खेळू शकतो का? असा प्रश्न विचारला. 

रुपाली, माधव, नेहा, किशोरीताई  आणि हिनाला एकत्र घेऊन खेळायचा प्रस्ताव तिनं ठेवला आहे. यावर एक सेकंदही विचार न करता रुपालीने संमती दिली. एकटं खेळू किंवा एकत्र खेळू मात्र एकमेकांसोबत आपण प्रामाणिक राहू असं शिवानीचं म्हणणं पडलं. शिवानीने सगळ्यांनाच पुढे येणारी आव्हान, काही टास्क या दृष्टीकोनातून स्पष्ट कल्पना दिली. 

तूर्त रुपाली आणि किशोरीताई शिवानीच्या मतावर सहमत झाले तरी शिवानीच्या मनात असलेला ग्रुप घरात आकार घेईन का? हे पाहण्यासारखं  ठरेन.