बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणाचं नातं कोणाशी कधी बदलेल याचा नेम नाही. आता हेच पाहा ना हिना आणि नेहा, शिवानी येण्याआधी खूप चांगल्या मैत्रीणी होत्या मात्र शिवानी आल्यानंतर हिना आणि नेहा या दोघींमध्ये फूट पडू लागली. शिनानीनं साप्ताहिक कार्य पूर्ण करताना हिनाला रडवण्याचादेखील प्रयत्न केला. आता तर चक्क शिवानीनं हिनाच्या अंगावर पाणीच ओतले.
शिवानी सुर्वेला प्रवेश दिला मग मला का नाही?, परागचा सवाल
हिनाला शिवानीचं वागणं अनपेक्षित होतं. यापूर्वी शिवानीनं परागच्या अंगावरही पाणी ओतलं होतं. जशी ती परागसोबत वागली त्याच गोष्टीची पुनरावृत्ती शिवानीनं पुन्हा केली आहे हे हिनानं तिला दाखवून दिलं. जे परागबरोबर केलंस तेच माझ्यासोबत केलंस, असं हिना म्हणाली. आता या दोघींही एकमेकींची थट्टा करत होत्या की खरंच शिवानीनं हिनावर रागात पाणी उडवलं हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
शाहिदचा 'कबीर सिंह' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट, मोडले अनेक विक्रम
शिवानीची या आठवड्यात घरात पाहुणी म्हणून एण्ट्री झाली आहे. शिवानीच्या परत येण्यानं घरातलं वातावरण पूर्ण बदललं आहे.