पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : शिवानीनं वीणा- हिनाला डांबलं अडगळीच्या खोलीत

शिवानी विणा

गेल्याच आठवड्यात घरात आलेली शिवानी सुर्वे ही या आठवड्यात घराची कॅप्टन झाली आहे.  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल 'हल्ला बोल' हे कॅप्टन्सी कार्य रंगले. ज्यात अभिजीत केळकर आणि शिवानी सुर्वे एकमेकांविरोधात उभे ठाकले. 

या कार्यात  शिवानीने बाजी मारून घराची नवी कॅप्टन होण्याचा मान पटकावला. टास्क दरम्यान सदस्यांमध्ये बरेच वाद, आरोप – प्रत्यारोप झाले, ओढाताणी झाली,  पण या सगळ्यावर मात करून शिवानीनं हा टास्क जिंकला. 

चेक बाऊन्स प्रकरण : मला अडकवण्याचा प्रयत्न, कोयनाचा आरोप

टास्कच्या आधी नेहा आणि शिवानी तर टास्क दरम्यान हिना आणि शिवानीमध्ये चांगलाच वाद झाला. शिवानी हिनाला तिच्या आईवरून जे काही बोलली ते तिला अजिबात आवडले नाही. या कार्यादरम्यान वीणा आणि हिनामध्ये कुजबूज सुरू होती. यावरून दोघींनाही  बिग बॉसनं टोकले. घरामध्ये कुजबुज करण्यास सक्त मनाई आहे याची आठवण  दोघींनाही बिग बॉसनं करून दिली. त्यानंतर नव्या कॅप्टन म्हणजेच शिवानीनं दोघींनां अडगळीच्या खोलीत डांबलं.

 या खोलीमध्ये बोलण्यास मनाई असल्याचे तिने सांगितले. विणा आणि हिनानं शिवानीला विरोध केला मात्र  मी कॅप्टन असल्यानं माझेच नियम असतील असं शिवानीनं सांगितलं. 

शिवानी सुर्वेला प्रवेश दिला मग मला का नाही?, परागचा सवाल

तर आज घरामध्ये 'एकला चलो रेट हे नॉमिनेशन कार्य रंगणार आहे. या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये कोण नॉमिनेट होणार ? कोण सेफ होणार ? हे बघणे रंजक असणार आहे.