पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवानीनं विणाला अखेर तिच्या आई-वडील आणि जोडीदाराची माफी मागायला लावलीच

शिवानी आणि विणा

शिवानी तब्येतीचं कारण सांगून बिग बॉसच्या घराबाहेर पडली. मात्र ती घरातून बाहेर गेल्यानंतर विणानं चारित्र्यावरून केलेली शेरेबाजी शिवानीला खटकली. विणानं परागशी बोलताना शिवानीबद्दल शेरेबाजी केली होती. बिग बॉसच्या घरात कोणत्याही सदस्यास प्रतिस्पर्ध्याच्या चारित्र्यावर शेरेबाजी करण्यास सक्त मनाई आहे. असं असतानाही  विणानं शेरेबाजी केली. या शेरेबाजीवरून  शिवानीचा जोडीदार आणि तिचे आई- वडील खूपच दुखावले होते. शिवानीची गेल्याच आठवड्यात पाहुणी म्हणून घरात एण्ट्री झाली. घरात आल्या आल्या शिवानीनं विणानं केलेल्या वक्तव्याचा जाब विचारला आहे.

अक्षयसोबत टक्कर टाळण्यासाठी 'साहो'च्या प्रदर्शनाची तारीख बदलणार?

यावरून विणानं स्पष्टीकरणही दिलं. विणाच्या शेरेबाजीमुळे जबरदस्त दुखावलेल्या शिवानीनं विणाला तिच्या  खासगी गोष्टी उघड करण्याची धमकीही दिली. हा वाद सुरु होत असताना बिग बॉस यांनी शिवानी आणि वीणाला कन्फेशन रूमध्ये बोलावून घेतले. घरामध्ये घरा बाहेरील वैयक्तिक गोष्टींवर शेरेबाजी करण्यास सक्त मनाई आहे, अशी तंबीही दोघींना बिग बॉसनं दिली. यानंतर शिवानीच्या सांगण्यावरून वीणाने शिवानीच्या आई वडिलांची आणि तिचा जोडीदार अजिंक्यची माफी मागितली.