पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : हीना आणि शिव घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट

बिग बॉस मराठी २

बिग बॉस मराठीच्या कालच्या भागामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली, त्यामुळे या आठवड्याअखेरीस एक सदस्य घराबाहेर जाणार आहे. आतापर्यंत घरातील सदस्यांनी त्यांना नको असलेल्या सदस्यांना नॉमिनेट केलं आहे मात्र यावेळी वेगळ्याप्रकारे नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. घरातील सदस्यांना त्यांच्या आवडत्या सदस्यांना घराबाहेर पडण्याच्या प्रक्रियेपासून वाचवायचं होतं.

बिग बॉस मराठी : मेघा - रेशमचा घरात प्रवेश

 या प्रक्रियेत वीणा, आरोह, नेहा, शिवानी सेफ झाले तर कमी मत मिळाल्याने हीना ही घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाली. शिव हा पूर्वीच बिग बॉसकडून नॉमिनेट झाला होता. काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये 'म्हातारीचा बूट' हे कॅप्टनसी कार्य सुरू होते मात्र शिवच्या चुकीमुळे हे कार्य स्थगित करण्यात आले. या चुकीची शिक्षा म्हणून बिग बॉस यांनी शिवला घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट केले.

Raksha Bandhan 2019 : 'गरिबीच्या काळात तिनं राहायला घर दिलं'

शिव आणि हीना हे दोघंही घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत आता प्रेक्षकांची मतं कोणाला  वाचवणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे.