पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : शिवची आई म्हणते, विणा तुला बहिणीसारखीच

बिग बॉस २

गेल्या दोन महिन्यांपासून बिग बॉसच्या घरात राहत असलेल्या सदस्यांना यावेळी बिग बॉसनं खास भेट दिली आहे. घरातील प्रत्येक सदस्यांना भेटायला त्यांची जवळची व्यक्ती आली आहे.  शिवला भेटायला त्याची बहीण आणि आई आली आहे. यावेळी आईनं शिवला अनेक सल्ले दिले. शिव त्याच्या  मूळ ध्येयापासून भरकटतोय अशी  जाणीव त्याच्या आईनं आणि बहिणीनं त्याला करून दिली.

'केजीएफ २' मध्ये संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत

त्याचप्रमाणे नेहा, रुपाली, हिना  आणि विणादेखील तुला बहिणीसारखी आहे, असं शिवची आई म्हणाली. शिवाच्या आईनं  विणा ही बहिणीसारखी आहे असं सांगताच घरातील सर्व सदस्यांना हसू फुटलं. शिव आणि विणा ही घरातील सर्वांची लाडकी जोडी आहे. घरातून बाहेर पडलेल्या माधवनं त्यांच्या दोघांमधलं प्रेम हे घराबाहेरदेखील कायम राहावं अशी इच्छा व्यक्त केली होती. 

दीपिका, रणबीरसह करणच्या पार्टीतील सर्व कलाकारांची उत्तेजकद्रव्य चाचणी करा, आमदाराची मागणी

मात्र शिवच्या आईला विणाबद्दल काही वेगळंच सुचवायचं होतं, हे पाहून सर्वांनाच हसू फुटलं. तर दुसरीकडे शिवनं स्वत:साठी खेळावं असाही सल्ला त्याच्या आईनं दिला आहे. थोडक्यात शिवनं विणासाठी भांडू नये, केवळ खेळावर लक्ष केंद्रीत करावं असं त्याच्या आईनं  आणि बहिणीनं सुचवलं आहे.  आता शिव आई आणि बहिणीनं दिलेला सल्ला किती  मनावर घेतो हे पाहण्यासारखं ठरणार आहे.