पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : पुष्कर, शर्मिष्ठा, स्मिता, सईनं केली घरातील सदस्यांची कानउघडणी

बिग बॉस मराठी

 बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिल्या पर्वातील सदस्य पाहुणे म्हणून आले आहेत. पहिल्या पर्वातील  पुष्कर, शर्मिष्ठा, स्मिता, सई यांनी सदस्यांना वेगवेगळे टास्क तर दिलेच पण घरातील नव्या  सदस्यांची कानउघडणी देखील केली. या चौघांनी घरातील सदस्यांच्या चुका दाखवून दिल्या पण त्याचबरोबर त्यांना मोलाचा सल्ला देखील दिला. 

अमृता खानविलकरच्या मालदीवमधल्या बोल्ड लूकची सोशल मीडियावर चर्चा

मला घरामध्ये यायला भीती वाटत होती, या शोप्रती घरातील सदस्यांना आदर नाही असं पुष्करचं म्हणणं पडलं. तर शर्मिष्ठा नेहाच्या वक्तव्यामुळे दुखावली. हे घर सायको आहे, विचित्र आहे असं नेहा  म्हणाली होती. यावर शर्मिष्ठानं आपली नाराजी व्यक्त केली. 

'घर हे घरामध्ये रहाणाऱ्या लोकांमुळे बनतं त्यामुळे जर सायको असतील तर घरातील लोक आहेत. या घराने आम्हाला खूप काही दिले आहे. त्यामुळे या वास्तूविषयी, या घराविषयी आणि बिग बॉसविषयी आम्ही कधीच ऐकून घेणार नाही' अशी ताकीद शर्मिष्ठानं दिली. तर घरातील सदस्य हे घराचाच अपमान करत आहेत असं सईचं म्हणणं पडलं. 

'जान्हवी' परत येतेय पण नव्या रुपात

टास्क तर खेळाच पण नातीदेखील जपा असा मोलाचा सल्ला शर्मिष्ठानं सर्वांना दिला. घरातून बाहेर पडल्यानंतरही आम्ही नाती जपली मात्र घरातून बाहेर पडल्यानंतर एकमेकांचे चेहरे बघाल की नाही ही देखील शंका आहे असं स्मिता म्हणाली.