पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घराबाहेर पडण्यासाठी रुपालीनं चक्क विणालाच केलं नॉमिनेट

बिग बॉस

बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसांपासून एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून वावरणाऱ्या वीणा आणि रुपालीच्या नात्यात फूट पडली आहे हे सर्वांच्याच लक्षात आलं असेन. विणाच्या वागण्यामुळे किशोरी शहाणे आणि रुपाली दोघंही हैराण आहेत. या तिघींचा ग्रुप केव्हाच फुटला आहे. आतापर्यंत एकत्र खेळणाऱ्या रुपाली आणि विणा आता  एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्या आहेत. या आठवड्यात घराबाहेर पडण्यासाठी रुपालीनं चक्क विणालाच नॉमिनेट केलं आहे.

विणामध्ये स्वत:च्या बाबतीच अतिआत्मविश्वास आहे. एवढा अतिआत्मविश्वास असणाऱ्यांना या घरात जागा नाही अशी बोचरी टीका रुपालीनं केली आहे. या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी  रुपालीनं विणाला नॉमिनेट केल्यानं घरातील सदस्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

शिवानीनं विणाला अखेर तिच्या आई-वडील आणि जोडीदाराची माफी मागायला लावलीच

काल घरामध्ये “कुटनीती” हे नॉमिनेशन कार्य पार पार पडले. यानुसार प्रत्येक सदस्याला चार सदस्यांना योग्य कारणे देऊन नॉमिनेट करणे अनिवार्य होते. बिग बॉस हा कार्यक्रम मनोरंजनाची मेजवानी आहे. जे सदस्य या मेजवानीची चव कमी करत आहेत त्यांना घरातील सदस्यांनी या आठवड्यामध्ये नॉमिनेट करायचे होते. त्यानुसार नेहा शितोळे, किशोरी शहाणे, शिव ठाकरे, वीणा जगताप, वैशाली म्हाडे, हिना पांचाळ आणि माधव देवचके घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत.