पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'बिग बॉस मराठी'च्या घरामधून रूपाली भोसले बाहेर !

रुपाली भोसले

'बिग बॉस मराठी'च्या घरामधून रुपाली भोसले बाहेर पडली आहे. रुपालीचा या घरातील प्रवास इथेच संपला आहे. गेल्या आठवड्यामध्ये हीना, विणा, अभिजीत बिचुकले, आरोह आणि रूपाली घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झाले होते. बिग बॉसच्या घरात पहिल्यापासूनच  घट्ट मैत्रीणी असलेल्या रूपाली आणि विणा डेंजर झोनमध्ये होत्या.  मात्र रुपालीला कमी मतं पडली आणि ती या खेळातून बाद झाली. 

बिग बॉस मराठी : शिवानी - रुपालीनं मागितली विणाच्या आईची माफी

घरातून बाहेर पडताना रुपालीनं  हिनाला सेफ केलं. घरातून बाहेर पडल्यानंतर रुपालीला एक विशेष अधिकार मिळाला, ज्याचा वापर करून तिनं हिनाला या आठवड्यासाठी घरातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेपासून वाचवलं. रुपालीनं पूर्वीच हिनाला हा शब्द दिला होता त्यामुळे जाता जाता एका आठवड्यासाठी ती हिनाला सेफ करून गेली. 

रुपाली फक्त माणसांचा वापर करते, वैशालीचं रोखठोक मत

तर विकेंडचा डावमध्ये बिग बॉसचे संचालक महेश मांजरेकर यांनी सर्वांनाच चांगलं फैलावर घेतलं. अभिजीत बिचुकले यांनी घरातील काही काम करण्यास नकार दिला. त्यामुळे महेश मांजरेकर यांनी कडक शब्दामध्ये त्यांना खडसावलं. तर वीणा आणि शिवलाही त्यांच्या चूका दाखवून दिल्या.