पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : परागशी बोलताना रुपालीला अश्रू अनावर

रुपाली पराग

बिग बॉसच्या घरात एका नव्या सदस्याची एण्ट्री झाली आहे. ही सदस्य म्हणजेच हिना पांचाळ होय. तिच्या येण्यानं पराग नक्कीच  रुपालीला विसरेन असं भाकित घरातून बाहेर  पडलेले सदस्य दिगंबर नाईक यांनी यापूर्वीच वर्तवलं होतं. आता हे भाकित किती खरं ठरतंय याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे परागशी बोलताना रुपाली भावूक झालेली पहायला मिळाली आहे. 

बिग बॉस मराठी २ : हिनामुळे पराग-रुपालीच्या प्रेमाचा रंग उडणार, दिगंबरचं भविष्य

घरात वीणा, पराग, रुपाली  आणि किशोरी यांचा वेगळा ग्रुप आहे. मात्र आता हा ग्रुप फुटण्याची जास्त चिन्ह निर्माण झाली आहेत. काल पार पडलेल्या भागामध्ये परागने किशोरी आणि रुपालीला तो ग्रुप सोडत असल्याचे सांगितले. परागने अचानक घेतलेल्या या निर्णयाने काय होईल ? खरोखरच हा ग्रुप तुटेल ? कि पुन्हा एकदा एकत्र येतील ? परागनं त्यांच्या ग्रुप मध्ये अभिजीत बिचुकले, नेहा शितोळे, माधव देवचके, हीना पांचाळ असतील असे देखील सांगितले.

'भारत'मधील हा कलाकार पोटापाण्यासाठी 'डीलिव्हरी बॉय' म्हणून करतो काम

यामुळे रुपाली बरीच भावूक झालेली दिसणार आहे. पराग एका गोष्टीमुळे खूपच दुखावला गेला आहे. त्यामुळे आता परत येणं अशक्य असल्याचं त्यानं सांगितलं. ग्रुप सोडत असलो तरी आपल्या जुन्या ग्रुपविरोधात कधीही खेळणार नाही असं पराग म्हणाला. मात्र यादरम्यान रुपालीला अश्रू अनावर झालेत नेमके रुपालीच्या डोळ्यात अश्रू का आले? ती का भावूक झाली हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.