पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : घरातील सदस्यांना परागची विनंती

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या आठवड्यात 'टिकेल तोच टिकेल'  हा टास्क सदस्यांना देण्यात आला आहे.  या टास्कमध्ये सिंहासनावर बसलेल्या सदस्याला उठवण्यासाठी वेगळ्या वेगळ्या युक्त्या करायच्या आहेत. बळाचा वापर न करता चातुर्याने त्या सदस्याला सिंहासनावरून उठवायचे आहे. मात्र या टास्कदरम्यानच्या काही गोष्टी परागला खटकल्या आहेत. त्यामुळे त्यानं कॅप्टन शिवच्या मदतीनं घरातील सदस्यांना विनंती केली आहे. 

फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये विकी कौशल प्रमुख भूमिकेत

 “तुझ्या मदतीने मला सगळ्या सदस्यांना एक विनंती करायची आहे. मी सिंहासनावर बसलेला नसताना देखील माझ्याविषयी काही गोष्टी बोलल्या जात होत्या. जोपर्यंत माझ्या घरच्यांबाबत, व्यवसायबाबत बोललं जात आहे तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आमच्या मैत्रीबद्दल बोललं जातं तेव्हा मला वाईट वाटलं. माझी एकच नम्र विनंती आहे की, तिसऱ्या व्यक्तीला यामध्ये आणू नका” अशी विनंती परागनं केली. 

मलायकानं अखेर अर्जुनसोबतचं नातं केलं मान्य

पराग व्यक्त होत असताना रूपालीला अश्रू अनावर झाले. रुपाली आणि पराग यांच्यामध्ये काहीतरी शिजतंय असं घरातील अनेक सदस्यांना  वाटत आहे. मात्र  त्यांच्या शंका रुपालीनं खोडून काढल्या आहेत. पराग हा केवळ माझा चांगला मित्र आहे असं रुपाली म्हणाली. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:big boss marathi 2 written update parag request to the contestant not to gossip about him