पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : या कारणासाठी परागचा आहे किशोरीताईंनाच पाठिंबा

किशोरी शहाणे

बिग बॉस मराठीचा सिझन २ संपायला आता आठवडा उरला आहे. पुढील आठवड्यात घराला नवा  विजेता मिळणार आहे.  नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, आरोह, किशोरी ताई, विणा जगताप हे सहाजण बिग बॉसच्या फिनालेमध्ये पोहोचले आहेत. यातून कोण विजेता ठरणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

अजय देवगन घेतली आलिशान कार, फक्त दोन भारतीयांकडेच आहे ती कार

खेळातील नियम मोडल्यामुळे बाहेरचा रस्ता दाखवलेल्या परागनं आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये किशोरीताईंना पाठिंबा का द्यावा याचं कारणही त्यानं लिहिलं आहे. किशोरी या घरातील ज्येष्ठ आहेत त्यांची खेळण्याची पद्धत वेगळी आहे त्या टीआरपीसाठी इतर सदस्यांसारखा आरडाओरडा करत नाही असं परागचं म्हणणं आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

किशोरीने स्टँड घेतला नाही? खरंच? मुळात स्टँड घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं तर दोघांचे भांडण असेल तेव्हा एकाच्या बाजूने स्टँड घ्यायचा. स्टँड हा स्वतःसाठी पण घ्यायचा असू शकतो. पण बिग बॉस ह्या शोची व्याख्याच वेगळी आहे. तिथे स्टँड घ्यायचा म्हणजे आरडाओरडा, शिवीगाळ करायची आणि वेळ पडली तर हिंसा करायची. उदा, पराग केळकरला वडिलांवरून बोलला घेतला शिवानी मॅडमनी स्टँड आणि घातला पायात पाय, तोंडातील पाणी त्याच्या अंगावर उडवलं. वीणाला कोण काय बोलले गेला शीव भांडायला ( फक्त विणालाच हं). कोणाबद्दल काही खटकलं केली चुगली वैशालीने आणि लावली आग दोघांमध्ये. वैशालीने विणाचा बाप काढला तरी घेतला दिगंबरने वैशालीच्या बाजूने चुकीचा स्टँड आणि चढवले तिला. शिवने काही केलं तरी दिला सल्ला अभिजीतने जणू तो दुधखुळा आहे. शिवानी माजली, ओरडली, चुकीचं वागली तरी दिली तिला साथ नेहाने. असा हवाय बिगबॉसला स्टँड घ्यायला ज्याने TRP वाढेल. आणि हाच आक्रस्ताळेपणा, लावालाव्या, शिवीगाळ, अरेरावी नाही जमली ताईला करायला . पण नीट आठवा हिनाला भाकरी हवी होती ताईने घेतला होता स्टँड की भाकरी आणि शिरा दोन्ही करू म्हणून. जेव्हा नेहा आणि शिवणीचं वाजलं तेव्हा ताई म्हणाली होती, "नेहा, स्पेस" शिवानीलाही समजावलं होत तिने, "अगं, ती कॅप्टन झाली आहे तर घेऊंदेना तिला निर्णय." बिचुकले चुकत होते तेव्हा ताई सांगत होत्या त्यांना. एवढंच कशाला परागच्या वेळी पण त्यांनी परागची बाजू घेतली पण सगळंच घर विरुद्ध गेलं तेव्हा त्यांना वाटलं पराग एकटा पडेल तो नाही राहू शकणार इथे परत. म्हणून त्या मेजोरीटी कडे वळल्या. वीणा म्हणाली ताई, तू तर बोलूच नकोस तेव्हाही त्यांनी ऐकवलं होतं वीणाला, रुपलीलाही म्हणाल्या होत्या, तू मला डोक्यावर पडली आहेस असं म्हणत जाऊ नकोस , नाही आवडत मला. अगदी पर्वाचाच तिकीट टू फिनलला पण त्या राहिल्या होत्या शेवटपर्यंत अडून. तो त्यांचा स्टँड नव्हता? ताईंनी वेळोवेळी स्टँड घेतला पण गोष्टी सॉर्ट कशा होतील हे बघितलं. आणि त्या म्हणाल्या तसा तो त्यांचा स्वभाव आहे , त्या आपल्या स्वभावानुसार वागल्या आणि तरीही खेळत राहिल्या, ह्या नव्या पिढीच्या आक्रस्ताळेपणाला झेलत राहिल्या. आणि म्हणूनच शेवटपर्येंत जिद्दीने टिकून राहिल्या.. ना कधी खोटं रडल्या ना कधी कांगावा केला, ना कधी दुसऱ्यावर आरो प केला ना कधी कुणाप्रति दिर्घद्वेष ठेवला. आम्हा प्रेक्षकानाही त्या म्हणूनच भावल्या. हेच कारण आहे आमचं ताईंना मत द्यायचं. अगदी शेवटपर्यंत आम्ही ताईंच्याच बाजूने राहू मग त्यांना ट्रॉफी मिळो वा न मिळो. किशोरीताई, We love you . #kamaalkishori

A post shared by Chef Parag Kanhere (@paragkanhere) on

किशोरीने स्टँड घेतला नाही? असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.  'मुळात स्टँड घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं तर दोघांचे भांडण असेल तेव्हा एकाच्या बाजूने स्टँड घ्यायचा. स्टँड हा स्वतःसाठी पण घ्यायचा असू शकतो. पण बिग बॉस ह्या शोची व्याख्याच वेगळी आहे. तिथे स्टँड घ्यायचा म्हणजे आरडाओरडा, शिवीगाळ करायची आणि वेळ पडली तर हिंसा करायची. ज्यानं  टीआरपी वाढेल त्यास बिग बॉसच्या भाषेत स्टँड घेणं म्हणतात' असं परागनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

शिवानीसोबत मैत्री ठेवायला वीणाचा नकार

आक्रस्ताळेपणा, लावालाव्या, शिवीगाळ, अरेरावी ताईंनी केली नाही म्हणून त्यांच्यावर स्टँड घेतला नाही? असा आरोप होत असल्याचं परागचं म्हणणं आहे. मात्र किशोरीताईंची वेगळी भूमिका होती. त्या प्रत्येकाच्या बाजूनं उभं राहिल्या. भांडणाचा गुंता सोडवला जाईन यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले असंही पराग म्हणाला. 

मलायका-अर्जुन पुन्हा सुट्टीवर

घरातील नव्या पिढीच्या आक्रस्ताळेपणाला त्या नेहमीच झेलत राहिल्या. शेवटपर्यंत जिद्दीने टिकून राहिल्या. ना कधी खोटं रडल्या ना कधी कांगावा केला, ना कधी दुसऱ्यावर आरोप केले ना कधी  द्वेष केला म्हणून मला त्या खूप आवडल्या असं परागनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:big boss marathi 2 written update parag kanhere write emotional post for kishori shahane