पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : परागला हे दोन सदस्य घरात नको

पराग ग्रुप

बिग बॉसच्या घरामध्ये दर आठवड्याला ग्रुप तयार होत आहेत. प्रत्येक सदस्य आपल्या सोयीनुसार जागा बदलत आहेत. हे ग्रुप तयार झाल्यानंतर दुसऱ्या ग्रुपमधील सदस्यांच्या विरोधात योजना आखणे, आरोप प्रत्यारोप करणे हे सगळ सुरूच असतं.  बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये असाच एक ग्रुप पहिल्या आठवड्यात तयार झाला आणि ज्याला प्रेक्षकांनी देखील पसंती दिली.  तो ग्रुप म्हणजे पराग, विणा, किशोरी, रुपाली यांचा ग्रुप होय. या ग्रुपमध्ये नंतर शिवही आला. 

मात्र परागनं अचानक हा ग्रुप सोडण्याचा निर्णय घेतला. विणानं मला दुखावलं असल्यानं मी ग्रुपमध्ये येणार नाही असं परागने किशोरी आणि रुपालीला सांगितले. मात्र आता पराग काही वेगळंच सांगताना दिसणार आहे. शेफ परागच्या डोक्यात सध्या 'मास्टर प्लॅन' शिजत आहेत. त्याला या घरात वैशाली म्हाडे आणि अभिजित केळकर हे दोन सदस्य नको आहेत.  बिग बॉसच्या पहिल्याच आठवड्यात वैशाली आणि परागमध्ये खटके उडाले  होते. 'मला तू अजिबात आवडत नाही', असं पराग वैशालीला सांगून मोकळा झाला होता. 

'तो' मुस्लिम असल्यानं वडिलांकडून मला मारहाण, हृतिकच्या बहिणीचा आरोप

तर अभिजितसोबतही परागचं पटत नाही. पराग आणि अभिजितची कडाक्याची भांडणं झाली होती, ज्यात पराग अभिजितच्या वडिलांपर्यंत पोहोचला होता. परागची ही गोष्ट अभिजितला खटकली होती. दुसऱ्या आठवड्यात अभिजितनं हा राग जाहीरपणे बोलून दाखवला होता. आता या दोघांनाही घराबाहेर काढण्याचे परागचे प्रयत्न आहेत. पराग आपल्या नव्या ग्रुपमधील सदस्यांना घेऊन अभिजित आणि वैशालीला नॉमिनेट करण्याची योजना आखत आहे कारण त्याच्या मते अभिजितनं त्यांचा ग्रुप तोडला आणि अभिजीतमुळेच त्यांच्या ग्रुपमधील सदस्य म्हणजेच शिव नॉमिनेट झाला. 

आता परागचा हा प्लॅन किती यशस्वी ठरतो हे पाहण्यासारखं ठरेन. दरम्यान या आठवड्यात विणा जगताप, विद्याधर जोशी, सुरेखा पुणेकर, अभिजीत  बिचुकले आणि पराग कान्हेरे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले आहेत. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Big Boss Marathi 2 Written Update parag kanhere want to kick out these contestant from home