पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले हे चार सदस्य

बिग बॉस मराठी २

 'बिग बॉस'च्या घरातून मैथिली  जावकर पहिली  बाहेर पडली. आता दर आठवड्याला एक सदस्य घराबाहेर पडणार आहे. या आठवड्यातील नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आहे. या प्रक्रियेसाठी घरातील सदस्यानं बहुमतानं चार जणांना नॉमिनेट केलं आहे. ज्यात किशोरी शहाणे, दिंगबर नाईक, नेहा शितोळे, पराग कान्हेरे या चार जणांचा समावेश आहे. 

यापूर्वीही नेहा आणि पराग घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. मात्र नशीबानं या दोघांना साथ दिली आता या आठवड्यात त्यांना नशिब साथ देतं का हे पाहण्यासारखं ठरणार आहे.  ज्येष्ठ अभिनेत्री  किशोरी शहाणे या बिग बॉस खेळाच्या विजेत्या दावेदारांपैकी एक मानल्या जातात त्यांना बहुमतानं नॉमिनेट केल्यानं त्यांच्या चाहत्यांसाठी हा धक्का मानला जातो. तर दुसरीकडे शेफ परागनं आपल्या वर्तणूकीनं घरातील सदस्यांचा राग ओढावून घेतला आहे. 

सहाव्या दिवशी 'भारत'च्या कमाईत ५५% ची घट
 

घरातील सदस्यांपेक्षा पराग हा नेहमीच रुपाली, विणा आणि किशोरी यांच्यासोबत जास्त रमतो. तर दिंगबर मात्र सेफ गेम खेळत वादात न पडता शक्य तितक्या अलिप्तपणे  खेळण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे घरातील सदस्यांना ही बाब खटकत आहे. तर  प्रत्येक गोष्टीत नाक खुपसण्याची सवय किंवा सतत भांडणाच्या पवित्र्यात असलेली नेहा ही घरातील सदस्यांच्या डोईजड होऊ लागली आहे. त्यामुळे दुसऱ्या आठवड्यात घरातील कोणता सदस्य घराबाहेर पडतो हे पाहण्यासारखं ठरेन.