पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रुपाली -वीणाच मला समजून घेत नाही, किशोरी शहाणेंची खंत

किशोरी शहाणे

बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन सुरू झाला आणि अल्पावधितच घरात  KVR ग्रुप तयार झाला. बिग बॉसच्या घरातला हा पहिला ग्रुप ठरला. या ग्रुपचे सदस्य होते किशोरीताई, विणा आणि रुपाली.  या तिघींची घरात चांगलीच गट्टी जमली. इतकी गट्टी की तिघींनाही इतर कोणत्याही ग्रुपमध्ये जावसं वाटलं नाही.  याच ग्रुपमध्ये नंतर परागही सामिल झाला. परागच्य़ा एक्झिटनंतर आता चर्चेत असलेल्या KVR ग्रुपमध्ये कुठेतरी फुट पडत आहे असे काही दिवसांपासून भासते आहे. 

बिग बॉस मराठी २ : बिग बॉसच्या घरामधून सुरेखा पुणेकर बाहेर

 विकेंडच्या डावमध्ये  किशोरी शहाणे यांनी  आपले मत व्यक्त केले. मला एकटं पाडलं जात आहे  अशी खंत त्यांनी व्यक्त केली. रुपाली आणि वीणा या दोघींनीही किशोरीताई बद्दल न पटणाऱ्या अनेक गोष्टी “एकच फाईट वातावरण टाईट' या टास्कमध्ये व्यक्त केल्या.  किशोरीताईंना वीणा, रुपालीचा स्पष्टवक्तेपणा खटकला. किशोरी शहाणे यांना घरामध्ये एकटे वाटू लागले आहे आणि त्यांनी या गोष्टी घरातील कॅमेरासमोर सांगितल्या.

VIDEO : तूच 'जजमेंटल', कंगनाचा पत्रकरासोबत मोठा वाद

किशोरीताईंनी वीणा आणि शिव यांच्या मैत्रीबद्दल केलेले वक्तव्य वीणाच काय रुपालीलाही  अजिबात पटले नव्हते. त्याच्या व्यक्तव्यामुळे  वीणाही खूप दुखावली होती. तर रुपालीच्या मनातही किशोरींताईंबद्दल अनेक दिवसांपासूनची खदखद होती तीही तिनं बोलून दाखवली आहे. आता या तिघींमधला वाद मिटतो का हे पाहण्यासारखं ठरेन.