पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : शिवानी घरात परत आलीये? पाहा व्हिडिओ

शिवानी सुर्वे

तब्येतीचं कारण देत अभिनेत्री शिवानी सुर्वे खेळ अर्ध्यावरच सोडूनच घरातून निघून गेली. बिग बॉसच्या विजेतेपदाची ती प्रबळ दावेदार मानली जात होती. मात्र बिग बॉससोबत वाद घालत शेवटी कायद्याची धमकी देत ती घरातून बाहेर पडली. शिवानीला घरातून हाकललं अशाही चर्चा होत्या. मात्र आता शिवानी घरात परत  येणार आहे अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. 

कलर्स मराठीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून बिग बॉस मराठीच्या विकेंडच्या डावाचा लहान प्रोमो शेअर केला आहे. ज्यात एक पाहुणी कन्फेशन रुममध्ये दिसली आहे. ही शिवानी सुर्वेच असल्याचं जवळपास सगळ्यांचं मत आहे. 

शिवानी कन्फेशन रुममधून घरात जाताना नेहाला हाक मारते. नेहा आणि शिवानी बिग बॉसच्या घरातील घट्ट मैत्रिणी होत्या. शिवानीची तब्येत ठिक नसताना नेहाच शिवानीसोबत होती. त्यामुळे घरात गेल्यानंतर शिवानीनं पहिली भेट ही नेहाची घेतली आहे. नेहा ही फक्त गेस्ट म्हणून विकेंडच्या डावपुरता बिग बॉसच्या घरात आली आहे की ती आता घरातच राहणार आहे याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना आहे.