पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : हीना पांचाळ घराबाहेर

हीना पांचाळ

बिग बॉस मराठी सिझन २ च्या घरामधला हीना पांचाळचा प्रवास संपला आहे. या आठवड्यात हीना आणि शिव हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले होते आणि कमी मत पडल्यामुळे हीनाला  घराबाहेर जावे लागले. शिवानी सुर्वे तब्येतीचं कारण देत घराबाहेर पडली, त्यानंतर हीनानं बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एण्ट्री घेतली.

'लस्ट स्टोरीज्'नंतर नेटफ्लिक्सवर 'घोस्ट स्टोरीज्', जान्हवी प्रमुख भूमिकेत

मात्र आता हीनाचा घरातील प्रवास संपला आहे. घरामधून हीना बाहेर पडल्यावर अभिजीत बिचुकले यांनी तिच्यासाठी गाणेही सादर केले. वाइल्ड कार्ड एण्ट्रीमधून हीनानं घरात प्रवेश केला. हीना मध्येच खेळात सहभागी झाल्यानं तिला घरातील प्रत्येकाचे स्वभाव, त्यांचे डावपेच माहिती होती. याचा वापर करून हीनानं घरात आपलं स्थान पक्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रेक्षकांची कमी मतं पडल्यानं आता हिनाला घराबाहेर जावं लागलं आहे.

तर दुसरीकडे या आठवड्यातील विकेंडचा डाव मध्ये महेश मांजरेकरांनी अभिजीत बिचुकलेंची, शिव - वीणाची शाळा घेतली. अभिजीत बिचुकले नेहेमीच चर्चेत असतात. मांजरेकर यांनी बिचुकलेंना घरात इतर सदस्यांची लायकी का काढता असा जाब विचारला. 

'साहो'ची प्रदर्शनापूर्वीच ३२० कोटींची कमाई?

हा खेळ संपायला  आता काही दिवस उरले आहेत त्यामुळे पुढील आठवड्यात कोण नॉमिनेट होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.