पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : हिनामुळे पराग-रुपालीच्या प्रेमाचा रंग उडणार, दिगंबरचं भविष्य

रुपाली पराग

बिग बॉसच्या घरातून 'कोकणचो माणूस' दिगंबर नाईक बाहेर पडले आहेत. तर शिवानीचीही घरातून एक्झिट झाली आहे. दोन सदस्य बाहेर गेल्यानंतर आता घरात  हिना पंचाळची वाईल्ड कार्ड एण्ट्री झालीये. विशेष म्हणजे हिनाच्या घरप्रवेशानंतर पराग - रुपालीच्या प्रेमाचा रंग उडेन असं भविष्य दिगंबर नाईक यांनी वर्तवलं आहे.

दिगंबर घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांचा घरातील अनुभव कसा होता हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. दिगंबर यांनी कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून एफबी लाईव्हद्वारे  चाहत्यांशी संवाद साधला. बिग बॉसच्या घरातील पराग आणि रुपालीच्या केमिस्ट्री बद्दल तुम्हाला काय वाटतं असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर  हिना पांचळमुळे पराग रुपालीला नक्की विसरेन असं भाकित दिगंबर यांनी वर्तवलं आहे.

बिग बॉस मराठी २ : दिगंबर म्हणतात, घरात किशोरी शहाणे या सर्वात FAKE

बिग बॉसच्या घरात रुपाली आणि पराग यांच्या प्रेमाची कळी खुलतेय हे हळहळू प्रेक्षकांच्या आणि घरातील इतर सदस्यांच्याही लक्षात येतंय. रुपालीकडे असलेला परागचा ओढा लपून राहिलेला नाही. तिच्या पायाला नेलपेंट लावणं असो किंवा तिला गोव्याला येण्याचं आमंत्रण देणं असो त्यांची 'लव्हस्टोरी' नेहमीच चर्चेत असते. मात्र हिना परागच्या सोबत राहिन आणि घरात हिनाच्या येण्यानं पराग रुपालीला पूर्ण विसरेन अशी शक्यता  दिगंबवर यांनी वर्तवली आहे.

आश्चर्य म्हणजे बिग बॉसच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी माझ्या स्वप्नात पराग आणि  बिचुकले आले  असल्याचं हिना म्हणाली होती. या स्वप्नात पराग आणि बिचुकले तिला घेऊन स्टेजवर आले. पराग, अभिजीत तिच्यासोबत  अंतिम फेरीत होते असं ती म्हणाली.  आता  हिनाच्या येण्यानं परागचं मन खरंच बदलतं का? दिगंबर यांचं भविष्य खरं ठरतं का? हे पाहण्यासारखं ठरेन. 

बिग बॉस मराठी 2 : मी शोमध्ये कमी दिसले, मैथिलीची खंत

तर दुसरीकडे परागच्या खेळीवरही दिगंबर यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. पराग हा घरातील सर्वात घातक खेळाडू आहे. तो बायकांच्या आडून खेळणार पुरूष आहे असं दिगंबर म्हणाले. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:big boss marathi 2 written update digambar naik share his experience parag will ditch rupali for hina