पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : दिगंबर नाईक घराबाहेर, तर हिना पांचाळची वाईल्ड कार्ड एण्ट्री

दिगंबर नाईक हिना पांचाळ

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीचा गेला आठवडा बराच गाजला. मैथिली जावकरनंतर घराबाहेर कोण पडणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. अखेर बिग बॉसच्या घरातून दुसरा सदस्यही बाहेर पडला आहे. हा सदस्य म्हणजे दिंगबर नाईक होय. 

या खेळात आता दर आठवड्याला एका सदस्याला बाहेर जाणे अनिवार्य असणार आहे. या आठवड्यामध्ये पराग कान्हेरे सेफ झाला. नेहा शितोळे,  विणा जगताप, किशोरी शहाणे, दिगंबर नाईक, माधव देवचके हे घरातून बाहेर पडण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले होते.  ज्यामध्ये अभिजीत बिचुकले आणि दिगंबर नाईक डेंजर झोनमध्ये गेले.

अखेर अभिजीत बिचुकले यांना नशीबानं साथ दिली. ते या घरातच राहिले मात्र दिगंबर घरातून बाहेर पडले. दिगंबर कोणतेही टास्क व्यवस्थित खेळत  नाही. बहुतेकदा तो अलिप्त राहतो, असा आरोप अनेकांनी केला होता. दिंगबरला बहुतेक सदस्यांनी नॉमेनिट केले होते अखेर या खेळातून ते तिसऱ्या आठवड्यात बाद झाले. 

तर  दुसरीकडे शिवानी सुर्वे बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली. गेल्या आठवड्यात शिवानीनं घराबाहेर जाण्यासाठी खूपच हट्ट धरला होता. अखेर बिग बॉसच्या घरातून तिची एक्झिट  झाली आहे. त्याजागी मॉडेल, अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हीना पांचाळची घरामध्ये वाईल्ड कार्ड एण्ट्री झाली आहे.