पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Bigg Boss Marathi 2 : शेफ पराग बिग बॉसच्या घरातून बाहेर?

पराग कान्हेरे

 बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व अनेक कारणांमुळे चर्चेत आलं आहे. घरातील सदस्य परागनं नेहा शितोळे हिच्यासोबत गैरवर्तन केल्यामुळे त्याला घराबाहेर काढण्यात आल्याच्या चर्चा आहेत. एबीपी माझा या खासगी वृत्तवाहिनीनं दिलेल्या  वृत्तानुसार परागनं एका टास्कदरम्यान रागाच्या भरात नेहा शितोळेला कानशिलात लगावली तसेच तिच्यासोबत गैरवर्तन केलं म्हणून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात  आल्याचं म्हटलं आहे.

'बिग बॉस 'मध्ये परतण्याबद्दल शिवानीचा खुलासा

 बिग बॉस या खेळातील नियमानुसार प्रतिस्पर्धी खेळाडूवर हात उचलण्यास सक्त मनाई आहे. मात्र परागनं याच नियमाचं उल्लघंन केल्यानं त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं म्हटलं आहे. याआठवड्यात घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठीही पराग नॉमिनेट झाला होता. गेल्याच आठवड्यात तो डेंजर झोनमध्ये होता. मात्र नशीबानं साथ दिल्यामुळे तो वाचला.

बिग बॉस मराठी २ : हिनामुळे पराग-रुपालीच्या प्रेमाचा रंग उडणार, दिगंबरचं भविष्य

आतापर्यंत  घरातील तीन सदस्य नॉमिनेट झाले आहेत.  यात मैथिली जावकर, दिगंबर नाईक, विद्याधर जोशी यांच्या समावेश आहे. तर शिवानी सुर्वे ही तब्येतीच कारण देत घराबाहेर पडली. तर खंडणी प्रकरणात अभिजित बिचुकले सापडल्यानं त्यांनाही हा खेळ अर्धवट सोडावा लागला.