पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : शेफ पराग शिकवणार प्रेमाची रेसिपी

पराग कान्हेरे

बिग बॉस मराठीच्या घरात शेफ पराग कान्हेरे आता घरातील सर्व सदस्यांना प्रेमाची रेसिपी शिकवणार आहे. आता तुम्हाला वाटत असेन की आजच्या भागात पराग एखादी छान रेसिपी तयार करायला शिकवणार आहे मात्र या कल्पना  वेळीच दूर करा कारण पराग आज घरातील सदस्यांना प्रेम शास्त्र हा विषय शिकवणार आहे.

'इंशाअल्लाह' टक्कर टळली, 'सूर्यवंशी'च्या प्रदर्शनाची तारीख ठरली

सध्या घरात शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. या टास्कसाठी बिग बॉस यांनी टीम नेमून दिल्या आहेत आणि त्यानुसार शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या सदस्यांना त्यांना नेमून दिलेले विषय विद्यार्थांना शिकवायचे आहेत. पराग कान्हेरे याला प्रेम शास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. आणि म्हणूनच आज या टास्कमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पराग प्रेमाचे धडे देणार आहे आणि ते सुद्धा प्रात्यक्षिक देऊन.

भेरी भेल डन !, लंडनमधल्या परदेशी भेळवाल्याचं बिग बींकडून कौतुक

यासाठी परागने रुपाली भोसलेसोबत डान्स सादर केला. ज्यावरून घरातील सदस्य पराग आणि रूपालीला बरेच चिडवताना दिसणार आहेत. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आणि घराबाहेर रुपाली आणि परागबद्दल बऱ्याच चर्चा रंगत आहेत. त्यात किती सत्य आहे हे त्यांनाच ठाऊक पण हा डान्स आणि प्रेमशास्त्राचा क्लास घरातील सदस्यांनी बराच एन्जॉय केला आणि तो आज प्रेक्षक देखील करतील.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:big boss marathi 2 written update chef parag kanhere giving love lesson to all contestant