पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

घरात येणार 'बिग बॉस'च्या पहिल्या सिझनमधले स्पर्धक

बिग बॉस

बिग बॉस मराठीच्या आजच्या भागात घरामध्ये विशेष अतिथी येणार आहेत.  बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आणि भरभरून प्रेम मिळाले. त्यातील सदस्य, त्यांची मैत्री, त्यांनी केलेले टास्क अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत आणि आता त्याच पर्वातले काही सदस्य घरात येणार आहेत. 

जामिनासाठी अभिजीत बिचुकलेंची हायकोर्टात धाव

आजच्या भागात घरामध्ये  पहिल्या सिझनमधील स्पर्धक सई लोकूर, पुष्कर जोग, स्मिता गोंदकर आणि शर्मिष्ठा यांचा प्रवेश होणार आहे. विशेष म्हणजे ते घरातील सदस्यांना टास्क देणार आहेत. पहिले पर्व गाजवलेले हे सदस्य घरातील सदस्यांना कोणता टास्क देणार आहेत आणि कोणता सदस्य त्यांचे मन जिंकणार आहे हे पाहण्यासारखं ठरणार आहे. 

मी अविवाहित पण मला ३ वर्षांची मुलगी, माही गिलचा खुलासा

तर दुसरीकडे  वैशाली आणि सुरेखा पुणेकर या दोन स्पर्धकांमध्येही मोठा वाद रंगणार आहे.  पपईवरून वैशाली आणि सुरेखा पुणेकर यांच्यामध्ये वाद झालेला पहायला मिळणार आहे.