पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : वीणा-आरोहमध्ये भांडण

विणा आणि आरोहमध्ये भांडण

बिग बॉसच्या घरात वीणा आणि आरोहमध्ये कडाक्याचं भांडणं झालं आहे. आरोहनं काही दिवसांपूर्वीच बिग बॉसच्या घरात एण्ट्री घेतली, घरातील जुन्या सदस्यांसोबत आरोहनं जुळवून घ्यायचा प्रयत्न केला. मात्र अनेकदा त्याचे घरातल्या सदस्यांशी खटकेही उडतात. आजच्या भागात आरोहाचं विणासोबत भांडण होणार  आहे. 

बिग बॉस मराठी : बिचुकलेंना पाण्यात उभं राहण्याची शिक्षा

आरोहाला प्रत्येक गोष्ट खुपते, असं वीणाचं म्हणणं आहे. आरोहाचा हा स्वभाव आवडत नसल्याचं वीणानं हिनाला सांगितलं, याचाच जाब आरोहनं वीणाला विचारला आहे. प्रत्येक गोष्टीचा त्रास आरोहला होतो, अशी वीणाची टीप्पणी आरोहला पटली नाही, अशी टिप्पणी वीणानं का केली असा प्रश्न त्यानं वीणाला विचारला आहे.

..म्हणून श्रीदेवी- जयाप्रदा यांना राजेश खन्ना यांनी एका खोलीत कोंडलं

या छोट्याश्या गोष्टीवरून सुरू झालेला हा वाद पुढे वाढतच गेला. तुझा अॅटीट्युड घरीच ठेव असंही वीणाला आरोहनं ऐकवलं.