पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिस बॉस मराठी २ : या कारणामुळे सर्व सदस्यांना मिळणार शिक्षा

बिग बॉस मराठी

प्रत्येक खेळाचे काही नियम असतात. हे नियम पाळूनच खेळ खेळायचा असतो एकदा का नियम मोडला की खेळाडू शिक्षेस पात्र  ठरतो, हे जाणण्याइतके सगळेच खेळाडू सूज्ञ आहेत. मात्र बिग बॉसच्या घरातील सदस्यांकडून बिग बॉसनं घालून दिलेल्या नियमांचं सतत उल्लघंन  होत आहेत. घरात स्थिरावून दोन आठवडे झाले आहेत. सदस्यांना  वारंवार सूचना देऊनही घरातील सदस्य नियम मोडताना दिसत आहेत. त्यामुळे आजच्या भागात घरातील सर्व सदस्यांना शिक्षा मिळणार आहे. 

बिग बॉस मराठी 2 : मी शोमध्ये कमी दिसले, मैथिलीची खंत
 

बिग बॉसच्या घराचा महत्वाचा नियम म्हणजे कोणताही नियम न मोडणे हा आहे. बिग बॉसच्या घरात प्रत्येक सदस्यांनं मराठीत बोलणं अनिवार्य  आहे. त्याचप्रमाणे माईक घालून वावरणंही बंधनकारक आहे. कुजबूज करण्यास इथे मनाई आहे.  लिव्हिंग एरियात वेळेवर जमणे हा देखील इथला  नियम आहे.  मात्र वारंवार सूचना देऊनही घरातील सदस्यांकडून  हे नियम पायदळी तुडवले जात आहे. 

बॉक्स ऑफिस टक्कर : २०२० मध्ये एकाच दिवशी प्रदर्शित होणारे चित्रपट

त्यामुळे आजच्या भागात घरातील सर्व सदस्य शिक्षेस पात्र ठरताना  पहायला  मिळणार आहेत. याव्यतिरिक्त नव्या आठवड्यात 'बिग बॉस मिठाईवाला' हे नॉमिनेशन कार्य रंगणार असून यामध्ये प्रत्येक सदस्याने घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी २ सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे.