पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : नेहानं मागितली बिचुकलेंची माफी

नेहानं मागितली बिचुकलेंची माफी

बिग बॉस मराठीच्या घरात बर्थडे सेलिब्रेशन पार पडणार आहे. या सेलिब्रेशनसाठी घरातील सदस्यांना घरामध्ये सजावट करायची आहे. मात्र सजावटीवरून देखील घरातील सदस्यांमध्ये खटके उडालेले आजच्या भागात पाहायला मिळणार आहेत.  

प्रियांकाला सदिच्छा दूत पदावरून हटवण्याची पाकची मागणी युनिसेफनं फेटाळली

सजावटीवरून नेहा आणि बिचुकले या दोघांमध्ये वाद झाला आहे. एरव्हीदेखील या दोघांमध्ये  अनेक छोट्या मोठ्या गोष्टीवरून मतभेद होतच असतात आता अभिजित बिचुकलेंनी केलेली सजावट न आवडल्यानं नेहानं घेतलेल्या भूमिकेमुळे ते कमालीचे चिडले आहेत. 

प्रियांका चोप्राच्या वादावर अभिनेता आयुष्मान म्हणतो...

बिचुकलेंनी केलेली सजावट नेहाला बिलकूल आवडली नाही. त्यामुळे नेहानं ती सजावट काढून टाकली. याचाच राग बिचुकलेंना आला आहे. नेहाच्या वागण्यानं ते दुखावले. सगळ्यांना घराची  सजावट करण्यास सांगण्यात आलं आहे. त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या परीनं सजावट केली. ती सजावट काढू नये असं किशोरी ताई आणि विणाचं म्हणणं पडलं. बिचुकले दुखावल्यामुळे नेहानं माफीही मागितली. पण, आता हा वाद किती पुढे गेला ? खरंच हा वादाचा मुद्दा होता का ? नक्की काय झाले ? हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.