पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : बिचुकलेंना पाण्यात उभं राहण्याची शिक्षा

अभिजित बिचुकलेंना शिक्षा

वाद आणि बिचुकले हे बिग बॉसच्या घरातलं पूर्वीपासून सुरू असलेलं समीकरण आहे. घरातील वादग्रस्त स्पर्धक म्हणून बिचुकले नेहमीच चर्चेत असतात. पण त्याचबरोबर बिचुकलेंच्या हातून घरातील नियमांचंही अनेकदा उल्लघंन होत आहे.  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नियमांचे उल्लंघन करण्यास सक्त मनाई आहे. असे केल्यास नियमभंग करणारा घरातील सदस्य शिक्षेस पात्र ठरतो. 

..म्हणून श्रीदेवी- जयाप्रदा यांना राजेश खन्ना यांनी एका खोलीत कोंडलं

हे ठावूक असूनही बिचुकलेंनी पुन्हा घरातील नियम मोडला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये दिवसा झोपण्यास सक्त मनाई आहे. घरात कोंबडा आरवल्यानंतर प्रत्येक सदस्यानं उठणं अनिवार्य आहे. मात्र अभिजित बिचुकलेंनी तो नियम मोडला. नियम मोडल्यानं बिचुकले हे शिक्षेस पात्र ठरले आहेत. तेव्हा नियम मोडणाऱ्या बिचुकलेंना नेहानं घराच्या स्विमिंग पुलमध्ये उभं राहण्याची शिक्षा सुनावली आहे. 

पती आदित्य पांचोली आणि मुलांवरील आरोपांवर झरिना वहाब यांनी सोडलं मौन

नेहानं बिचुकलेंना स्विमिंग पूलच्या पाण्यात उभं राहण्याची शिक्षा दिली आहे. आता ही शिक्षा बिचुकले पूर्ण करणार का हे पाहण्यासारखं ठरेन.