पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : सदस्यांना भेटायला येणार बिचुकलेंची आई

अभिजित बिचुकले

बिग बॉस मराठी सिझन २ च्या आजच्या भागात अभिजित बिचुकलेंना भेटायला त्यांची आई, पत्नी आणि मुलं येणार आहेत. बिचुकलेंनी पहिल्या दिवसापासून घरातील सदस्यांसोबत वाद  घातले होते,  त्यामुळे घरातील सदस्य बिचुकलेंची तक्रार त्यांच्या आईकडे करणार का? हे पाहण्यासारखं ठरणार आहे. 

या मराठी कलाकाराच्या अभिनयानं प्रभावित झाली परिणीती चोप्रा

घरात आल्यानंतर बिचुकलेंच्या आईंनी सर्वांनाच दम भरला.  'घरातील चार मुलं सांभाळायला जमत नाही त्यातून तुम्ही सगळी घरातली कारटी, तुमच्यामुळे बिग बॉसना झोप लागत नाही, असं बिचुकलेंच्या आईचं म्हणणं पडलं. बिचुकलेंच्या आईचा हा भाबडेपणा पाहून सर्वांनाच हसू फुटलं. घरातील सगळीच मुलं बिग बॉसना त्रास देतात असं बिचुकलेंच्या आईचं प्रामाणिक मत आहे. 

अभिनेत्रीच्या भेटीचं आमिष दाखवून चाहत्याला ६० लाखांचा गंडा

घरातील सर्व सदस्यांना बिचुकलेंच्या आईंनी एकमेकांशी चांगलं वागण्याचा सल्ला दिला. तर दुसरीकडे अभिजित बिचुकलेंची पत्नी आणि मुलंदेखील घरात आली .  बिचुकलेंनी पत्नीला त्यांच्या छोट्या मुलीला शिवानीकडे देण्याची विनंती केली. माझी मुलगी ही शिवानीसारखीच झाली पाहिजे असं बिचुकले म्हणाले होते, त्यामुळे बिचुकलेंची चिमुकली घरात आल्यानंतर त्यांनी आपल्या मुलीला शिवानीच्या मांडीवर ठेवलं. हे पाहून शिवानीही भावूक झाली.  आजच्या भागात चाहत्यांना  हे पाहायला मिळणार आहे.