पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : अभिजीत केळकर घराबाहेर

अभिजीत केळकर

बिग बॉस मराठी सिझन २ च्या घरातून अभिजीत केळकर घराबाहेर पडला आहे.  घरातून बाहेर पडण्यासाठी गेल्या आठवड्यात आरोह वेलणकर, किशोरी शहाणे, अभिजीत केळकर आणि शिव ठाकरे नॉमिनेट झाले होते. किशोरी शहाणे आणि अभिजीत केळकर हे दोघंही डेंजर झोनमध्ये होते.  किशोरी शहाणेंना नशिबानं साथ दिली मात्र अभिजीत केळकर हा एलिमनेट झाला. 

दीपिका आणि प्रियंकाचे इन्स्टाग्रामवर आहेत इतके फेक फॉलोअर्स

अभिजीतच्या जाण्यानं शिवला अश्रु अनावर झाले. त्याला विश्वास ठेवणे अशक्य होते. अभिजीतच्या जाण्यानं घरातील प्रत्येक सदस्याला वाईट वाटले.  मी तुला टॉप ५ मध्ये पाहिलं होतं मात्र घरामध्ये मतं मांडणारा आणि त्या मतावर ठाम राहणारा सदस्य बाहेर गेला अशा शब्दात महेश मांजरेकर यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं. 

कुटुंबीयांना धमकी, अनुराग कश्यपने टि्वटरचा केला त्याग

बिग बॉसच्या या आठवड्यातील WEEKEND चा डाव हा खास  होता आणि सदस्यांना सरप्राईझ देखील मिळाले.  सलमान खाननं  बिग बॉसच्या सेटवर उपस्थिती लावली होती. सलमाननं देखील  सदस्यांशी बर्‍याच गप्पा मारल्या, त्यांना सल्ला दिला आणि बरीच मजा मस्तीदेखील केली. अभिजीत घराबाहेर पडला  बिग बॉस मराठीच्या सिझन २ मध्ये आता येत्या आठवड्यामध्ये कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.