पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : 'माझ्या मुलाची खेळण्याची गाडीच २५ हजारांची'

अभिजित बिचुकले

बिग बॉसच्या घरात आलेला प्रत्येक दिवस भांडणात जात आहे. त्यातून कवी मनाचे नेते बिचुकले  यांना वाद हा चिकटलेलाच आहे. तिसरा आठवडा उलटला तरी घरातील सदस्यांच्या  ते फारसे पसंतीस उतरत नाहीये. अशातच पराग,  रुपाली आणि बिचुकले यांच्यामध्ये बिस्किटांवरून वाद झाला.

बिस्किट खाण्यावरून पराग आणि रुपालीनं टोकल्यानं अभिजित बिचुकले खुपच दुखावले. घरातील  इतर सदस्यांसमोर दुखावलेल्या बिचुकले यांनी आपली मनातील खदखद बोलून दाखवली. इतकंच नाही तर  बोलता बोलता त्यांनी आपल्या तमाम प्रेक्षकांना आपल्या श्रीमंतीचं दर्शनही घडवलं.

'नच बलिये'मध्ये सलमाननं आणणार सर्वात मोठा ट्विस्ट
 

 माझ्या मुलाची खेळण्यातली गाडीच पंचवीस हजारांची आहे, अशी गाडी कोणाकडेच नसेन असं ते  भावनेच्या ओघात बोलून गेले इतकंच नाही तर पंचवीस लाख ते पाच कोटींच्या डिल आपण सहज करतो असंही ते म्हणाले. एकाअर्थी आपण आर्थिक दृष्ट्या किती सधन आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न बिचुकलेनं केला. हे सर्व कालच्या भागात घडलं.

काय घडणार आजच्या भागात 

आजच्या भागात शेफ पराग कान्हेरे हे घरातील सर्व सदस्यांना प्रेमाचे धडे देणार आहे. सध्या घरात शाळा सुटली पाटी फुटली हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. या टास्कसाठी बिग बॉस यांनी टीम नेमून दिल्या आहेत आणि त्यानुसार शिक्षकाच्या भूमिकेत असलेल्या सदस्यांना त्यांना नेमून दिलेले विषय विद्यार्थांना शिकवायचे आहेत. पराग कान्हेरे याला प्रेम शास्त्र हा विषय विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. आणि म्हणूनच आज या टास्कमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना पराग प्रेमाचे धडे देणार आहे आणि ते सुद्धा प्रात्यक्षिक देऊन. वाचा सविस्तर