पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : फिनालेमध्ये पोहोचणारा पहिला सदस्य कोण?

बिग बॉस मराठी

बिग बॉसचा खेळ आता निर्णायक वळणार पोहोचला आहे. पुढील महिन्यात या घराला नवा  विजेता मिळणार आहे. सध्या घरात नेहा शितोळे, किशोरीताई, विणा जगताप, अभिजित बिचुकले, आरोह, शिव ठाकरे,  शिवानी सुर्वे हे सात सदस्य राहिले आहेत. यातले कोणते सदस्य फिनालेमध्ये पोहोचणार याची उत्सुकता चाहत्यांना आहे.

महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी आमिर खानची २५ लाखांची मदत

बिग बॉस मराठीच्या घरात खेळातून बाद झालेल्या सदस्यांनी प्रवेश केला. या घरामध्ये आलेल्या सदस्यांवर बिग बॉस यांनी एक महत्वपूर्ण कार्य सोपावले.  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये उरलेल्या पाच सदस्यांपैकी त्यांना वाटणार्‍या कोणत्याही दोन सदस्यांना वाचवायचे आहे. सध्या घरात असलेले सदस्य या खेळातून बाद होण्याच्या प्रक्रियेत जुन्या खेळाडूंचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. 

हा निर्णय घरात राहिलेल्या स्पर्धकांचं खेळातील भवितव्य ठरवणार आहे. त्यामुळे सेफ असणारा सर्वोत्तम खेळाडू कोण हे आजच्या भागात पाहायला मिळणार आहे. विद्याधर जोशी, दिगंबर नाईक, माधव देवचके, सुरेखा पुणेकर  यांनी शिवानी आणि नेहा या दोन सदस्यांची नावे घेतली. वैशाली म्हाडेने शिव आणि नेहा तर मैथिली जावकर हिने शिव आणि वीणा यांची नावे घेतली.

दिवंगत अभिनेत्री जिया खानवर माहितीपट ?

आज घरामध्ये अभिजीत केळकर, रूपाली भोसले, हीना पांचाळ येणार असून हे सदस्य कोणत्या दोन सदस्यांची नावे घेतील हे बघणे रंजक ठरणार आहे. आजच्या भागात फिनालेमध्ये पोहचणार्‍या पहिल्या सदस्याचे नावही घोषीत केले जाणार आहे.