पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : होणार का ती घरातील पहिली कॅप्टन?

बिग बॉस मराठी

'बिग बॉस'नं पहिल्याच आठवड्यात घरातील प्रत्येक सदस्यांना सवाल ऐरणीचा हा टास्क दिला आहे. नॉमिनेशनपासून  सेफ व्हायचं असेल तर दोन्ही टीममधील प्रत्येक सदस्यांना हा टास्क करणं गरजेचं आहे. टीममधल्या रुपालीला नॉमिनेशनपासून वाचवण्यासाठी नेहाला दिवसभर गळ्यात बिग बॉसच्या घरात राहण्यास अपात्र असल्याची पाटी  त्याचप्रमाणे कपाळावर 'अपात्र' लिहून वावरण्यास सांगण्यात आलं आहे.

मात्र हा  टास्क करण्यास तयार होण्यापूर्वी नेहानं आपल्या टीमसमोर प्रपोजल ठवलं होतं. जर घरच्या सदस्यानं पुढील आठवड्यात माझ्या नावाचा विचार कॅप्टन म्हणून केला तरच मी अपात्र असल्याचा कलंक मिरवायला तयार होईल असं डिल तिनं  घरच्यापुढे ठेवलं होतं. टीमनंही रुपालीला वाचावण्यासाठी तिची मागणी मान्य केली. 

 अभिजित बिचुकले यांच्या टीममधून नेहा आणि वैशाली म्हाडेच्या टीम मधून शिव यांना कॅप्टनसीची उमेदवारी देण्यात आली आहे  आता आजच्या भागात बिग बॉस मराठी सिझन २ चा पहिला कॅप्टन कोण होईल हे  कळणार आहे. पहिली कॅप्टन नेहा  होते की शिव हे  पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.