पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी सिझन २ : घरातील सदस्यांसाठी 'पोपटाचा पिंजरा'

बिग बॉस २

बिग बॉस मराठी सिझन २ च्या  दुसऱ्या आठवड्याला सुरूवात झाली आहे. आता खेळ खऱ्या  अर्थानं रंजक व्हायला सुरुवात होणार आहे. पहिल्या आठड्यात घरातील सदस्यांनी एकमेकांशी ओळखी वाढवल्या, मैत्री झाली, ग्रुपही तयार झाला  यावेळी वाद विवादही झाले. पहिल्याच आठवड्यात शिव, नेहा की  शिवानी घराबाहेर जाणार हे पाहण्यास प्रेक्षक उत्सुक होते. मात्र नॉमिनेटेड सदस्यांवरून एलिमनेशनची टांगती तलवार पहिल्या आठवड्यात  तरी  टळली. 

बिग बॉसच्या घरात शिवला घरातील  पहिला कॅप्टन होण्याचा मान मिळाला. गेल्याआठड्यात घरात सवाल ऐरणीचा टास्क रंगल्यावर दुसऱ्या आठड्यात घरातील सदस्यांना पोपटाचा पिंजरा हा टास्ट देण्यात येणार आहे. ज्यामध्ये बिग बॉस घरातील सदस्यांना त्यांना नको असलेल्या सदस्यांना नॉमिनेट करण्याची संधी देणार आहे. आणि ही संधी एका पक्ष्यामध्ये दडलेली आहे. प्रत्येक टीमकडे विरुध्द टीमच्या सदस्यांचे पक्षी असणार आहेत. प्रत्येक बझरनंतर सदस्यांना विरुध्द टीममधल्या नको असलेल्या सदस्याचा पक्षी पिंजऱ्यात बंधिस्त करायचा आहे म्हणजेच विरुध्द टीमच्या सदस्याला नॉमिनेट करायचे आहे. 

आता कोण कोणाला नॉमिनेट करत हे पाहणं मजेशीर ठरणार आहे. आठवड्याच्या सुरूवातीलाच  घरातील सदस्यांनी अभिजित बिचुकले,  शिव आणि वैशाली म्हाडे या तिघांना बहुमतानं घरात राहण्यास अपात्र असल्याचं ठरवलं होतं. आताही संपूर्ण घर बिचुकलेविरोधात उभी राहणार का? कोण कोणाला  नॉमिनेट करणार हे आजच्या  भागात पाहयला मिळणार आहे.