पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रुपाली फक्त माणसांचा वापर करते, वैशालीचं रोखठोक मत

रुपाली भोसले

आठ आठवडे बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर गायिका वैशाली म्हाडे घरातून बाहेर पडली. घरातून बाहेर पडल्यानंतर वैशालीनं कलर्स मराठी वाहिनीच्या अधिकृत फेसबुक पेजवरून चाहत्यांशी एफीबी लाईव्हद्वारा संवाद साधला. 

बिग बॉस मराठी २ : रुपालीनं दगा दिला, पराग झाला भावूक

घरातील तिचा अनुभव कसा होता हे ऐकण्यासाठी सर्वच चाहते उत्सुक होते. विशेष म्हणजे विणा आणि रुपालीबद्दल अनेक चाहत्यांनी तिला प्रश्न विचारला. विणासोबत तिचे सुरूवातीला अनेकदा खटके उडाले होते मात्र हिच विणा गेल्या काही दिवसांत तिची चांगली मैत्रीण झाली होती. या दोघीही बिग बॉसची स्पर्धा जिंकू शकतात का असं तिला विचारण्यात आलं होतं. यावर वैशालीनं नाही असं उत्तर दिलं.

अभिनेत्री गायत्री जोशी ऑबेरॉयच्या क्रेडिट कार्डची माहिती चोरून लुटले ४० हजार

रुपालीच्या स्वभावाबद्दल वैशालीनं नाराजीही व्यक्त केली. रुपालीबद्दल माझं चांगलं मत नाही, ती कोणाशीही प्रामाणिक नाही. स्पर्धेचा विजेता होण्यासाठी आवश्यक असणारे कोणतेही गुण तिच्यात नाही, तिच्यामध्ये नेतृत्त्वगुण नाहीत समजूतदारपणाही नाही असंही वैशाली म्हणाली 
घरात अधिक काळ राहता यावं यासाठी ती घरातील काही सदस्यांचा वापर करतेय असं रोखठोक मत वैशालीनं मांडलं आहे.