पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवानी आणि वीणाबाबत 'बिग बॉस'नं घेतला कठोर निर्णय

बिग बॉस

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये 'चोर बाजार' हे साप्ताहिक कार्य संपले. या टास्क दरम्यान घरामध्ये खूप क्लेश, हातापायी आणि भांडण झाली. सदस्यांनी एकमेकांचे कपडे, सामान उधळून लावले. प्रत्येक सदस्य आपल्या टीमला टास्कमध्ये जिंकवण्याच्या मागे होता, परंतु यामध्ये सदस्यांनी घरातील नियमांचे उल्लंघन केले. वेळोवेळी बिग बॉस यांनी ताकीद देऊनही सदस्यांची मनमानी सुरूच होती.

वयानं मोठा पुरुष जोडीदार चालतो मग स्त्री का नाही?- प्रियांका चोप्रा जोनास

या टास्क दरम्यान शिवानी आणि वीणामध्ये शाब्दिक चकमक झाली मात्र दोघींनी एकमेकांवर  हात देखील उचलले. बिग बॉसच्या घरात मारहाण करणे अथवा कुठल्याही प्रकारची हिंसा करण्यास मज्जाव आहे. तसा नियमच असून घरात प्रवेश करण्यापूर्वीच हे सदस्यांना सांगण्यात आलं होतं. मात्र  शिवानी आणि वीणानं हा नियम पायदळी तुडवला.  रागावर ताबा नसल्याने हे कृत्य शिवानी आणि वीणाकडून घडले.

या दोघींनी नियम तोडले आणि त्याचे समर्थन देखील केले. अशा प्रकारची हिंसा सुज्ञपणाच्या व्याख्येत मोडत नाही असे बिग बॉस यांनी दोघींनाही निक्षून सांगितले. अशा प्रकारच्या कोणत्याही घटना बिग बॉसच्या घरात घडू नये अथवा अशा घटना घडण्यासाठी त्याला चालना मिळू नये म्हणून बिग बॉसनी याससंदर्भात कठोर निर्णय सुनावला आहे. 

शिवानी आणि वीणा बिग बॉसच्या घरात रहाण्यास अपात्र आहेत असा निर्णय बिग बॉसनं सुनावला आहे. बिग बॉसच्या या निर्णयाने सगळ्या सदस्यांनां आश्चर्याचा धक्का बसला आहे.  यापूर्वी शेफ पराग कान्हेरे यानं शिवानीला घरातून काढावे अशी विनंती केली होती. टास्क सुरू होण्याआधी पराग- शिवानीमध्ये घडलेल्या  वादात शिवानीनं  परागवर हात उचलण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर शिवानी आणि शिवमध्येही याच टास्कदरम्यान  बाचाबाची झाली होती. शिवानीनं नियमांचं उल्लंघन करू नये अशी ताकिद शिवनंही तिला दिली होती. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:big boss marathi 2 update shivani surve and veena jagtap ineligible to stay in big boss house