पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी सिझन २ - माधव देवचके घराबाहेर

माधव देवचके

बिग बॉस मराठी -२ च्या घरातील स्पर्धक माधव देवचके याचा प्रवास संपला आहे. त्यामुळे बिग बॉसच्या घरातील नेहा, शिवानी आणि माधव यांचे त्रिकुट तुटले आहे. या आठवड्यामध्ये माधवसोबत हीना, वीणा, नेहा, किशोरी हे सदस्य घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले होते. माधव आणि किशोरी डेंजर झोनमध्ये आले होते. मात्र किशोरी शहाणे यांना नशिबाने पुन्हा एकदा साथ दिली. त्यामुळे माधव देवचके घरातून बाहेर पडला. 

उत्तर कॅलिफोर्नियाः फुड फेस्टिवलमध्ये माथेफिरुचा बेछुट गोळीबार, ३ ठार

शिवानी, हीना आणि नेहाच्या खूप जवळचा मित्र घरामधून बाहेर पडल्यामुळे या तिघींनाही अश्रू अनावर झाले. माधवच्या बाहेर जाण्याने नेहा आणि शिवानीला खूप मोठा धक्का बसला. माधव आणि नेहा यांची या घरातील मैत्री खूप घट्ट होती. रुसवे-फुगवे असले तरी दोघे ही एकमेकांना खूप समजून घ्यायचे आणि एकमेकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहायचे. माधव घराबाहेर पडेपर्यंत त्यांच्या मैत्रित कधी दुरावा आला नाही. आपल्या जवळचा मित्र घराबाहेर गेल्यामुळे नेहा खूप दुखावली आहे. 

कर्नाटकनंतर आता 'मिशन मध्य प्रदेश', भाजप नेत्याचे संकेत

बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर पडताना आपल्या मित्रांना सोडून जाताना माधवलाही खूप दु:ख झाले. 'या घरामध्ये मला खूप चांगले मित्र मिळाले' असल्याची प्रतिक्रिया माधवने दिली. दरम्यान, 'माणूस म्हणून या घरामध्ये खूप छान होतास. माधव कधीच डर्टी गेम खेळाला नाही. कधी दुसऱ्या सदस्यांबाबत जास्त बोलला नाही' असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. घरातून बाहेर पडल्यानंतर माधवने त्याची खास मैत्रिण नेहाला सेफ केले.

मुंबईतील IIT च्या वर्गात आलेला पाहुणा बघून विद्यार्थ्यांना धक्का