पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : तू आग लावतो, कोणी सुनावलं बाप्पा जोशींना

बिग बॉस

बिग बॉसच्या घरात आतापर्यंत अनेक कलाकारांचे एकमेकांशी खटके उडाले. मात्र यात काही सदस्य असेही आहेत  ज्यांनी वाद विवादापासून स्वत:ला चार हात लांबच ठेवलं आहे. यात विद्याधर जोशी हे अग्रक्रमाने आले. घरातील ज्येष्ठ सदस्य या नात्यानं ते प्रत्येक सदस्यांच्या कलानं घेत आहेत. 

त्याच त्याच विषयावर वाद घालत बसण्यापेक्षा  कमीत कमी भांडणं करा, असा सल्ला गेल्याच आठवड्यात घरातील सदस्यांना देणारे बाप्पा आता मात्र चक्क  घरातील सदस्य वीणाशी वाद घालताना दिसणार आहेत. मागचा संपूर्ण आठवडा विद्याधर जोशी म्हणजे बाप्पा हे अत्यंत शांतपणे, समंजसपणे सगळ्यांना सांभाळून घरात वावरताना दिसले  होते पण आज मात्र विणा आणि विद्याधर जोशींमध्ये कडाक्याचे भांडण होणार आहे.

ज्यामध्ये वीणानं बाप्पा  हे नेहमीच काड्या करतात किंवा आग लावतात असं म्हणाली. विणाच्या या आरोपानंतर बाप्पाही तिच्यावर भडकलेले दिसले. वीणाला विद्याधर जोशी यांनी बिंडोक असे म्हटले आणि ज्यामुळे ती खूप चिडली. पराग आणि किशोरी शहाणे या दोघांनीही विणा आणि विद्याधर जोशी यांच्यातील वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. आता या वादाचे पुढे काय होणार ? कोण नमतं घेणार ? हे  आजच्या भागामध्ये पहायला मिळणार आहे.