पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी 2 : तिच्यामुळे आले किशोरी शहाणेंच्या डोळ्यात अश्रू

किशोरी शहाणे

घर म्हटलं की  भांड्याला भांडं लागणं आलंच आणि त्यातून बिग बॉसचं घर म्हटलं की  वाद हा आलाच. घरात १४ भिन्न स्वभावाचे लोक वावरत आहेत. प्रत्येकाला हा  खेळ  जिंकायचा आहे. मग त्यासाठी साम- दाम- दंड- भेद  ही रणनिती मध्ये आणायलाही काही सदस्य मागेपुढे पाहत नाही. 

घरात सदस्यांचे कितीही खटके उडाले तरी काही सदस्य मात्र वादापासून चार हात लांब राहणंच पसंत करतात. यात किशोरी शहाणे आल्याच. मराठी चित्रपटसृष्टीतल्या ज्येष्ठ अभिनेत्री या नात्यानं घरातील प्रत्येक सदस्य त्यांच्याशी आदरपूर्वकच वागत आहेत. घरातील ज्येष्ठ या नात्यानं त्या अनेकदा घरातील सदस्याचे वादही सोडवताना दिसतात. मात्र याच किशोरी शहाणेंच्या डोळ्यात घरातील एका सदस्यामुळे पाणी आलं आहे. ही सदस्य म्हणजे शिवानी होय.

बिग बॉसनं घरातील सदस्यांना नवा टास्क दिला आहे. टास्क दरम्यान प्रत्येक सदस्याची कसोटी लागते. हा टास्क सदस्य कसा पूर्ण करतात हे महत्वाचे असते, पण यामध्ये कधी कधी घरातील इतर सदस्य दुखावले जातात. चोर बाजार या टास्क दरम्यान किशोरी शहाणे आणि शिवानी सुर्वेमध्ये चांगला वाद झाला आणि त्यांनी शिवानीला सायको देखील म्हटले. त्यावर शिवानीने देखील उत्तर दिले “किशोरी शहाणे असतील ते त्यांच्या घरी, माझ्यासमोर आवाज नाही करायचा”

किशोरी शहाणे अगदी पहिल्या दिवसापासून सगळ्या सदस्यांशी मिळून मिसळून रहात आहेत. त्यांचा आधार घरातील बाकी सदस्यांना वाटतो आहे. पण बिग बॉस यांनी दिलेल्या चोर बाजार या टास्क दरम्यान शिवानी आणि किशोरी मध्ये वाद झाला. या टास्क दरम्यान त्याचं सामान उध्वस्त केलं, त्यांन टार्गेट केलं या गोष्टीच किशोरी शहाणे यांना खूप वाईट वाटलं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.