पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : किशोरीताईंनी शिवला बांधली राखी

बिग बॉसच्या घरात रक्षाबंधन

गेल्या ८० दिवसांहूनही अधिक काळ बिग बॉस मराठीच्या खेळातले स्पर्धक आपल्या कुटुंबीयांपासून लांब राहत आहेत. नुकताच घरातील सदस्यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. घरातील प्रत्येकाला आपल्या बहिणीची, भावाची खूपच आठवण येत होती. त्यामुळे घरातील सदस्यांनी एकत्र येत घरातच रक्षाबंधन सण साजरा केला.

अशी मिळाली अमृताला 'Sacred Games 2' मध्ये भूमिका

घरातील ज्येष्ठ सदस्य किशोरीताईंनी शिवला राखी बांधली. शिव हा किशोरीताईंना मोठी बहीण मानतो. त्यामुळे किशोरीताईंनी घरातील लहान सदस्य शिवला राखी बांधून रक्षाबंधन साजरी केली. मात्र याच दरम्यान घरातील इतर सदस्यांनी शिवची थोडी गम्मतही केली. काही दिवसांपूर्वी शिवची आई आणि बहीण घरात आले होते. यावेळी शिवच्या आईनं विणासह घरातील सर्वच तुझ्या बहिणी असल्याचं सांगितलं होतं. 

अमेय म्हणतो हा नशिबान खेळलेला 'Sacred Games'

याची शिवानीनं आठवण करून दिली, अर्थात तिचा बोलण्याचा रोख हा विणाकडेही होता. विणा आणि शिव हे घरातील चर्चेत असलेलं जोडपं आहे. घरातल्या इतर सदस्यांनी अभिजीत बिचुकले, आरोह यांनादेखील राख्या बांधल्या. सर्वांसाठीच हा भावूक क्षण होता.