पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : शेफ परागची डाळ कुठे शिजतेय?

बिग बॉस

बिग बॉसच्या घरात शेफ पराग कान्हेरेची डाळ  नेमकी  कुठे  शिजतेय याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे. सध्या  बिग बॉसच्या घरात चोर बाजार टास्कचा  डाव रंगतोय. या टास्कपासून पराग मात्र अलिप्त राहतोय. टास्क सुरू होण्यापूर्वी पराग आणि  शिवानी दोघांमध्ये  वाद झाले या वादात शिवानीनं परागवर हात उचलण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे नाराज झालेल्या परागनं जोपर्यंत बिग बॉस शिवानीवर कारवाई करत नाही तोपर्यंत खेळात सहभागी  न होण्याची भूमिका घेतली आहे. 

या चोर बाजार टास्क दरम्यान रुपालीचा मेकअप किट विरुध्द चोर बनलेल्या टीमने चोरला आहे. यावरून परागनं रुपालीची  फिरकी घेतली. लोक २ तास ३७ मिनिट मेकअप करत आहेत असं पराग मस्करीत म्हणाला. त्याचा रोख हा रुपालीकडे असल्याचं समजताच किशोरी मध्ये पडल्या. 'बिचारीचा मेकअप किट चोरला आहे तरी सांभाळून घेते आहे, असं नाही हा बोलायचं' असं म्हणत परागच्या मस्करीत किशोरीदेखील सहभागी झाल्या. 

किशोरी, रुपाली आणि विणाचा वेगळाच ग्रुप असल्याचं  जवळपास घरातील प्रत्येक सदस्यांना ठावूक आहे. त्यामुळे किशोरी ही गोष्ट रुपालीला सांगेन हा अंदाज परागनं बांधत 'हे आपल्यातच राहु दे तिला नका सांगू मी असं म्हटलं,  नाही तर माझी वाट लागेल' अशी विनंती किशोरींना केली. हे संभाषण इथेच थांबले नाही, ' मी प्रयत्न करतो आहे करू देत असं उत्तर परागनं दिलं. यावर 'डाळ शिजते आहे का ?' असं विचारत  किशोरी ताईंनी परागची चांगलीच मजा घेतली. घरात पराग आणि रुपाली यांच्यात काहीतरी शिजतंय का? याची उत्सुकता प्रेक्षकांना देखील आहे. आजच्या भागात याचा उलगडा होणार आहे. विकेंडचा डावमध्ये कार्यक्रमाचे होस्ट महेश मांजरेकर यांनी देखील याच विषयावरून परागची चांगलीच  फिरकी घेतली होती.