पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Big Boss Marathi : घरात पडणार तिघींचा ग्रुप, इतर सदस्य होणार का सामील?

बिग बॉस मराठी २

बिग बॉसच्या घरात सध्या दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांचं नेतृत्व अभिजित बिचुकले  आणि वैशाली म्हाडेच्या हातात आहे. खरं तर हे गट टीम लीडरनं तयार केले आहेत त्यामुळे नाईलाजानं का होईना घरातील सदस्य या गटात सहभागी झाले आहेत. मात्र हळूहळू घरात वेगळेच ग्रुप तयार होत आहेत.

 घरात सध्या किशोरी शहाणे, विणा जगताप आणि रुपाली भोसले यांचा वेगळाच गट तयार झाला आहे. किशोरी शहाणे बिग बॉसच्या घरातील प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. सुरूवातीचे चार दिवस त्यांनी अत्यंत सेफ गेम खेळला आहे. प्रत्येकाला साभांळून घेण्याच्या त्यांच्या खेळीमुळे  अद्यापही त्यांचे घरातील कोणाशीही खटके उडाले नाहीत. 

बिग बॉस मराठी २ : शहाणपणा करायचा नाही, अभिजित बिचुकलेंना कोणी दिला धमकीवजा इशारा

अगदी घरात  अभिजित बिचुकले विरोधी संपूर्ण घर असा वाद रंगला असला तरी  किशोरी शहाणे मात्र वादापासून चार हात लांबच आहेत उलट अनेकदा मध्यस्थीच करताना त्या दिसतात. आता घरात विणा, किशोरी आणि रुपाली या तिघींचा ग्रुप तयार होताना दिसत आहे. हा ग्रुप शेवटपर्यंत टिकतो का? घरातील इतर सदस्य या ग्रुपमध्ये सहभागी होतात की या तिघींच्या विरोधात जातात हे बघणं औत्सुक्याचे ठरणार आहे.