पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : हे दोन स्पर्धक पोहोचले फिनालेमध्ये

बिग बॉस मराठी २

बिग बॉस मराठीचा दुसरा सिझन संपायला अवघे काही दिवस उरले आहेत.  या खेळाचा विजेता कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. पण त्याआधी सिझन 2 च्या अंतिम फेरीत नेहा शितोळे आणि शिवानी सुर्वे यांनी आपले स्थान निश्चित आहे. शिवानी सुर्वे आणि नेहा या दोघीही विजेतेपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जातात. या स्पर्धेची विजेती मीच होणार असाही दावा शिवानीनं केला होता.

फोर्ब्सच्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या यादीत अक्षय कुमार चौथ्या स्थानी

शिवानी आणि नेहा या दोघींनीही फिनालेमध्ये धडक दिली आहे. या आठवड्यात बिग बॉसच्या घरात खेळातून बाद झालेले सदस्य आले होते. त्यांच्यावर बिग बॉसनं मोठी जबाबदारी सोपवली होती.  या सदस्यांना दोन स्पर्धकांना सेफ करायचे होते. नेहा ९ पैकी ८ आणि शिवानी ९ पैकी ५ मतं मिळवून अंतिम फेरीत पोहोचल्या. 

अभिनेता आदित्य रॉय कपूर या मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चा

या दोघींच्या नावाची घोषणा झाल्यानंतर या खेळातील शेवटची नॉमिनेशन प्रक्रियाही पार पडली. या आठवड्यात आरोह, किशोरी, वीणा आणि शिव घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाले आहेत.