पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : मेघा - रेशमचा घरात प्रवेश

मेघा - रेशमचा घरात प्रवेश

बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व अनेक गोष्टींमुळे चर्चेत आलं. पुढील महिन्यात हा खेळ संपणार आहे. घराला नवा विजेता मिळणार आहे. ७९ दिवस वाद विवाद, चांगल्या वाईट आठवणींनी हा खेळ रंगला. काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या पहिल्या सिझनमधल्या काही सदस्यांनी  घरात प्रवेश केला. यात पुष्कर, सई, शर्मिष्ठा, स्मिता हे सदस्य घरात आले होते. घरातील सदस्यांना चौघांनी टास्क दिले, चुकीच्या भूमिकांसाठी कानउघडणीही केली.

Video : चालकाकडून पैसे उधार घेऊन जान्हवीची गरीब मुलीला मदत

आता घरात पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडेनं प्रवेश केला आहे. मेघा बरोबरच  रेशम टिपणीस आणि सुशांत शेलारनंही घरात उपस्थिती लावली आहे. आता खेळाच्या या टप्प्यावर पोहचल्यानंतर हे जुने गडी नव्या सदस्यांना कोणते सल्ले देतील ? कसे प्रोत्साहन देतील ? हे बघणे रंजक ठरणार आहे.

पाकिस्तानातील कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे मीका सिंहवर AICWA ची बंदी

त्याचप्रमाणे आज घरात “जुना गडी नवं राज्य” हे साप्ताहिक कार्यही रंगणार आहे. या टास्कमध्ये बिग बॉसच्या घराचे रूपांतर एका राज्यात होणार आहे. या राज्याचा राजा आणि राणी असणार आहे. सदस्यांना विविध कार्य पार पाडून राणीला किंवा राजाला जिंकून द्यायचं आहे.