पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी : निर्णयप्रक्रियेचा खेळखंडोबा, हिनाला मिळणार शिक्षा

हिना पांचाळ

'बिग बॉस मराठी'च्या घरामध्ये या आठवड्याच्या सुरूवातीला 'खांब – खांब' हा कॅप्टनसी टास्क रंगला. या टास्कदरम्यान सदस्यांमध्ये बरेच वाद विवाद, भांडणंही झाली. शिव आणि आरोहमध्ये झालेल्या झटापटीमुळे बिग बॉस यांनी कार्यासाठी दिलेल्या प्रॉपर्टीचेही नुकसान झाले. हिना या कार्याची संचालिका असल्याने प्रॉपर्टीचे नुकसान करणाऱ्या शिव आणि आरोह या दोघांनाही तिनं टास्कमधून बाद केले.

...म्हणून अक्षयला 'मिशन मंगल'च्या पोस्टरमध्ये सर्वाधिक प्रसिद्धी 

मात्र हाच प्रकार वीणा आणि किशोरी शहाणे यांच्या हातूनही घडला. पण यावेळी निर्णय घेताना  हिना काहीशी संभ्रमात पडली. संचालिका असूनही तिनं अनेकदा आपले निर्णय बदलले. त्यामुळे बिस बॉसनं हिनाला सुनावलं आहे. हीनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे कॅप्टनसीच्या निर्णय प्रक्रियेचा खेळखंडोबा झाला, इम्युनिटी मिळते त्याच कार्यात मोठी चुक झाली अशा शब्दाल बिग बॉसनं हिनाला सुनावलं, त्यामुळे आजच्या भागात हिनाला तिच्या हातून घडलेल्या चुकीची शिक्षा मिळणार आहे. 

कलम ३७० : अनेक चित्रपटांचं चित्रीकरण रखडलं

हीनाला तिच्या चुकीची कोणती शिक्षा बिग बॉस देणार हे आजच्या  भागात पाहायला मिळणार.