पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बिग बॉस मराठी २ : शहाणपणा करायचा नाही, अभिजित बिचुकलेंना कोणी दिला धमकीवजा इशारा

बिग बॉस मराठी २

'बिग बॉस मराठी सिझन २' ला सुरूवात झाल्यापासून एकंदरच घरात कवी मनाचे नेते अभिजित बिचुकले विरोधात संपूर्ण घर असं चित्र आहे. चार दिवस उलटले तरी  हे चित्र बदलायचं काही नाव घेत  नाही. बिचुकले यांचा स्वभाव, सतत बदलत जाणारी भूमिका घरातील प्रत्येकांनाच खटकत आहे. त्यामुळे घरातील सदस्यांनी पहिल्याच आठवड्यात बहुमतानं बिचुकलेंना नॉमिनेट केलं. मात्र नशिबानं साथ दिल्यानं  बिचुकले टीम  लीडर झाले.  टीम लीडर झाले असले तरी टीममधील सदस्यांसोबतही त्यांचे वारंवार खटेक उडत आहेत. 

पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात रुपाली- नेहा यांचा अभिजित बिचुकले यांच्यासोबत वाद झाला आहे. या सगळ्या भांडणामध्ये रुपालीने अभिजित बिचुकले यांना  “शहाणपणा करायचा नाही, पाठीमागे बोलू नका” असा जवळपास धमकीवजा इशाराच दिला आहे. यापूर्वीही  बोलण्यावर नियंत्रण ठेवण्याचा  इशारा  रुपालीनं अभिजित यांना दिला होता.  मात्र या भागात रुपाली आणि अभिजित यांच्यामध्ये जोरदार भांडणं पहायला मिळणार आहे.

या दोघांमध्ये वादाची ठिणगी नेमकी का पडणार  हे आजच्या भागात पहायला मिळणार आहे. तर पराग आणि टीम लीडर वैशाली म्हाडे यांच्यामध्येही  वादाची ठिगणी पडणार आहे. सवाल ऐरणीचा या टास्क दरम्यान पराग आणि वैशाली मध्ये वाद झाला या वेळी “मला तुम्ही तिघीही आवडत नाही” असं शेफ पराग म्हणाला. परागच्या नावडत्या तीन स्पर्धेक कोणत्या हेदेखील  आजच्या भागात प्रेक्षकांना कळणार आहे.